India vs Pakistan Match Schedule: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचं यजमानपद पाकिस्तानकडे आहे. मात्र भारतीय संघाने या स्पर्धेसाठी पाकिस्तानात जाण्यास नकार दिला आहे. भारताने यापूर्वीही पाकिस्तानात जाण्यास विरोध केला आहे.
आताही बीसीसीआय आपल्या मतावर ठाम आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत- पाकिस्तान लढत होणार की नाही ही नंतरची गोष्ट आहे. मात्र त्याआधी भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ २ वेळेस आमनेसामने येणार आहेत.
एशियन क्रिकेट काऊंसिलने ACC एशिया कप स्पर्धेची घोषणा केली आहे. महिलांच्या या स्पर्धेसाठी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांना एकाच संघात ठेवण्यात आलं आहे.या स्पर्धेत ६ संघांनी प्रवेश मिळवला आहे. (ACC Asia Cup)
या ६ संघांना २ गटात विभागलं गेलं आहे. अ गटात भारत, नेपाळ आणि पाकिस्तानचा संघ आहे. तर ब गटात मलेशिया, श्रीलंका आणि बांगलादेश या ३ संघांचा समावेश आहे.
या स्पर्धेला १५ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात यजमान मलेशिया आणि बांगलादेश हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. तर याच दिवशी भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत.
भारतीय संघाचा सामना पुढील सामना नेपाळविरुद्ध होणार आहे. दोन्ही गटातील टॉप २ मध्ये राहणारे संघ सुपर फोर राऊंडमध्ये प्रवेश करणार आहेत. सुपर फोरमधून २ संघ फायनलमध्ये प्रवेश करणार आहेत.
महिलांच्या स्पर्धेनंतर पुरुषांच्या अंडर १९ एशिया कप स्पर्धेतही भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना ३० नोव्हेंबरला होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेत भारतीय संघाचे सामने जपान आणि यूएईविरुद्ध होणार आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.