IND vs AUS: मिशन BGT साठी टीम इंडियाने कंबर कसली! सिक्रेट सरावाचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

India vs Australia Test Series: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये होणाऱ्या सामन्यापूर्वी भारतीय संघाने कसून सराव करायला सुरुवात केली आहे.
IND vs AUS: मिशन BGT साठी टीम इंडियाने कंबर कसली! सरावाचा सिक्रेट VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
virat kohli twitter
Published On

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेला येत्या २२ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना पर्थमध्ये रंगणार आहे. या मालिकेसाठी भारतीय खेळाडू ऑस्ट्रेलियात दाखल झाले आहेत आणि कसून सरावाला देखील सुरुवात केली आहे.

भारतीय संघाचा सराव पर्थमध्ये सुरु आहे. मात्र हा सराव सिक्रेट ठेवण्यात आला आहे. कोणालाही हा सराव पाहता येणार नाहीये. दरम्यान क्रीडा पत्रकार क्लोए एमांडा बेलीने जसप्रीत बुमराहआणि विराट कोहली सराव करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो सध्या तुफान व्हायरल होतोय.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये जसप्रीत बुमराह कसून गोलंदाजी करताना दिसतोय. तर विराट कोहली फलंदाजी करताना दिसतोय. यासह सरफराज खान आणि शुभमन गिल मस्ती करताना दिसून येत आहेत.

ऑस्ट्रेलिायाविरुद्ध होणारी कसोटी मालिका ही भारतीय संघासाठी अतिशय महत्वाची असणार आहे. कारण मायदेशात खेळताना भारतीय संघाला न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला.

IND vs AUS: मिशन BGT साठी टीम इंडियाने कंबर कसली! सरावाचा सिक्रेट VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
IND vs AUS, Pitch Report: पहिल्या कसोटीआधी टीम इंडियासाठी बॅड न्यूज! पर्थमधून समोर आली मोठी अपडेट

त्यामुळे भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनयशिपची फायनल गाठणं कठीण झालं आहे. जर भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल गाठायची असेल, तर ऑस्ट्रेलियाला कुठल्याही परिस्थितीत ४-० ने पराभूत करावं लागेल. असं झाल्यास भारतीय संघाला फायलनचं तिकीट मिळवण्यासाठी इतर कुठल्याही संघावर अवलंबून राहावं लागणार नाही.

IND vs AUS: मिशन BGT साठी टीम इंडियाने कंबर कसली! सरावाचा सिक्रेट VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
IND vs AUS: खरंच ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात 4-1 ने हरवणं शक्य आहे का? BGT मध्ये कसा राहिलाय दोन्ही संघांचा रेकॉर्ड?

भारतीय संघाने आतापर्यंत सलग २ वेळेस वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी भारतीय संघाला सलग तिसऱ्यांदा फायनलमध्ये जाण्याची संधी असणार आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय संघाला फायनलमध्ये जाण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं. मात्र न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर आता फायनल गाठणं कठीण झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com