Border Gavaska Trophy: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा थरार रंगणार आहे. ही स्पर्धा सुरु व्हायला अवघे १० दिवस शिल्लक राहिले आहेत. या मालिकेसाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे.
या मालिकेतील पहिला सामना २२ नोव्हेंबरपासून पर्थच्या मैदानावर रंगणार आहे. दरम्यान या सामन्यात खेळपट्टी कशी असेल, याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
हा सामना पर्थच्या ओप्टस स्टेडियममध्ये रंगणार आहे. या स्टेडियममध्ये ड्रॉप इन खेळपट्टीचा वापर केला जाणार आहे. ओप्टस स्टेडियमचे पिच व्यूरेटर मॅकडॉनल्ड यांनी म्हटले की, ' बॉर्डर- गावसकर कसोटीतील पहिल्याच सामन्यात गोलंदाजांना मदत मिळेल.चेंडू वेगाने येतील आणि उसळीही मिळेल. त्यामुळे भारतीय गोलंदाजांनी सावध राहावं. WACA स्टेडियममध्ये आता फार क्रिकेटचे सामने होत नाहीत. ऑप्टस स्टेडियमची खेळपट्टीही तशीच असू शकते. इथे ड्रॉप इन खेळपट्टीचा वापर केला जाऊ शकतो.'
ऑप्टसच्या मैदानावर हा पाचवा कसोटी सामना असणार आहे. यापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ या मैदानावर आमनेसामने आले होते. २०१८ मध्ये झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना नाथन लायनने ८ गडी बाद केले होते.
या शानदार गोलंदाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने १४६ धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यात विराटने भारतीय संघाकडून दमदार कामगिरी केली होती. त्याने १२३ धावा केल्या होत्या.
इएसपीएन क्रिकइन्फोनेल्या दिलेल्या मुलाखतीत बोलताना मॅकडॉनल्ड म्हणाले की, ' हे ऑस्ट्रेलिया आहे, हे पर्थ आहे. अर्थातच मी चेंडूला गती आणि उसळी मिळेल, अशी खेळपट्टी तयार करतोय. मी गेल्या वर्षी बनवली होती, तशीच खेळपट्टी बनवण्याचा प्रयत्न करतोय.'
या मालिकेतील पहिला सामना २२ नोव्हेंबरपासून पर्थमध्ये रंगणार आहे. हाी मालिका भारतीय संघासाठी अतिशय महत्वाची असणार आहे. कारण भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका ३-० ने गमावली आहे.
त्यामुळे आता भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका कुठल्याही परिस्थितीत जिंकावी लागणार आहे. भारतीय संघाला जर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल गाठायची असेल, तर ही मालिका कुठल्याही परिस्थितीत ४-१ ने जिंकावी लागणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.