Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहला प्लेइंग ११ मधून बाहेर का ठेवलं? समोर आलं टेन्शन वाढवणारं कारण

India vs New Zealand 3rd Test: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या सामन्यातून जसप्रीत बुमराहला विश्रांची देण्यात आली आहे.
Jasprit Bumrah
India vs New Zealand 3rd Testtwitter
Published On

India vs New Zealand 3rd Test: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याचा थरार मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात मोठा बदल करण्यात आला आहे. जसप्रीत बुमराहला प्लेइंग ११ मधून विश्रांती देण्यात आली आहे.

भारतीय संघाने मालिकेतील सुरुवातीचे दोन्ही सामने गमावले आहेत. त्यामुळे व्हॉईट वॉशपासून वाचण्यासाठी भारतीय संघाला तिसरा सामना जिंकणं अतिशय महत्वाचं असणार आहे. दरम्यान या महत्वाच्या सामन्यातून बुमराहला संघाबाहेर का ठेवण्यात आलंय, याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

नाणेफेकीनंतर काय म्हणाला रोहित शर्मा?

नाणेफेक गमावल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला, 'आम्हाला माहीत आहे, आम्ही या मालिकेत चांगली कामगिरी करु शकलेलो नाही. खेळपट्टी चांगल्या कंडीशनमध्ये आहे, त्यामुळे आम्ही त्यांना लवकरात लवकर बाद करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. बुमराह अस्वस्थ आहे. त्यामुळे त्याच्या जागी, मोहम्मद सिराजला संधी दिली गेली आहे.' नाणेफेक झाल्यानंतर बीसीसीआयने पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी बुमराहला इन्फेक्शन असल्याची माहीती दिली आहे. त्यामुळे तो तिसरा कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे.

Jasprit Bumrah
IND vs NZ: टीम इंडियाला मोठा धक्का! मुंबई कसोटीतून मुख्य गोलंदाज बाहेर; कारण...

न्यूझीलंडविरुद्धची ३ कसोटी सामन्यांची मालिका झाल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या मालिकेत भारतीय संघाला ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. या दौऱ्यावर जसप्रीत बुमराह भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज असणार आहे.

Jasprit Bumrah
IND vs NZ 3rd Test: विराट ते रोहित... हे 4 भारतीय खेळाडू मुंबईत शेवटचा कसोटी सामना खेळणार

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

न्यूझीलंड - टॉम लेथम (कर्णधार), डेवोन कॉनव्हे, विल यंग, रचिन रविंद्र, डेरिल मिचेल, टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, इश सोढी, मॅट हेनरी, एजाज पटेल, विल्यम ओ’रुर्क.

भारत: यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सरफराज खान, रविंद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, आर अश्विन, आकाश दीप, मोहम्मद सिराज.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com