BAN vs AFG: रहमानुल्लाह गुरबाजने रचला इतिहास! एका झटक्यात मोडला सचिन, विराट अन् बाबरचा रेकॉर्ड

Rahmanullah Gurbaz Record: रहमानुल्लाह गुरबाजने बांगलादेशविरुद्ध झालेल्या सामन्यात ८ वे शतक झळकावले आहे. या रेकॉर्डसह त्याने मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.
BAN vs AFG: रहमानुल्लाह गुरबाजने रचला इतिहास! एका झटक्यात मोडला सचिन, विराट अन् बाबरचा रेकॉर्ड
Rahmanullah Gurbaztwitter
Published On

Rahmanullah Gurbaz Breaks Sachin Tendulkar Record: अफगाणिस्तान आणि बांगलादेश या दोन्ही संघामध्ये वनडे मालिकेचा थरार सुरू आहे. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानने ५ गडी राखून शानदार विजय मिळवला. अफगाणिस्तानला विजय मिळवून देण्यात रहमानुल्लाह गुरबाजने मोलाची भूमिका बजावली.

मैदानाच्या चारही बाजूंना फटकेबाजी करत त्याने शानदार शतकी खेळी केली. या खेळीच्या बळावर त्याने आपल्या संघाला विजय मिळवून दिला. यासह अफगाणिस्तानने ही मालिका २-१ ने आपल्या नावावर केली. दरम्यान गुरबाजने शतकी खेळी करत मोठे रेकॉर्ड मोडून काढले आहेत.

हे रहमानुल्लाह गुरबाजच्या वनडे कारकिर्दीतील ८ वे शतक ठरले आहे. यासह तो वनडे क्रिकेटमध्ये ८ शतकं झळकावणारा आशियातील सर्वात युवा फलंदाज ठरला आहे. या रेकॉर्डमध्ये त्याने वयाच्या २२ व्या (२२ वर्ष ३४९ दिवस) वर्षी करून दाखवला आहे. यासह तो अफगाणिस्तानसाठी सर्वाधिक शतक झळकावणारा फलंदाज आहे.

सचिनला सोडलं मागे

तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने हा रेकॉर्ड २२ वर्ष ३५७ दिवस इतकं वय असताना केला होता. तर भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने हा रेकॉर्ड वय २३ वर्ष २७ दिवस असताना केला होता.

तर बाबर आझमने वय २३ वर्ष २८० दिवस असताना केला होता. या यादीत दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज क्विंटन डी कॉक अव्वल स्थानी आहे. डी कॉकने वय २२ वर्ष ३१२ दिवस असताना वनडेत ८ शतकं झळकावली होती.

BAN vs AFG: रहमानुल्लाह गुरबाजने रचला इतिहास! एका झटक्यात मोडला सचिन, विराट अन् बाबरचा रेकॉर्ड
IND vs AUS: पर्थ कसोटीसाठी अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ११! हा विस्फोटक फलंदाज करणार पदार्पण

अफगाणिस्तानचा शानदार विजय

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, बांगलादेशचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशला २४४ धावा करता आल्या. बांगलादेशकडून फलंदाजी करताना महमदुल्लाहने सर्वाधिक ९८ धावांची खेळी केली. यासह कर्णधार मेहदी हसनने ६६ धावा चोपल्या.

BAN vs AFG: रहमानुल्लाह गुरबाजने रचला इतिहास! एका झटक्यात मोडला सचिन, विराट अन् बाबरचा रेकॉर्ड
IND vs AUS: रोहितचा पर्याय सापडला! पर्थ कसोटीत हा स्टार फलंदाज ओपनिंग करणार

अफगाणिस्तानला हा सामना जिंकण्यासाठी २४५ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानकडून गुरबाजने शानदार शतकी खेळी केली. या खेळीच्या बळावर अफगाणिस्तानने ४९ व्या षटकात विजय मिळवला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com