

टीम इंडियाने टी-२० वर्ल्डकप २०२६ च्या फायनलमध्ये एन्ट्री केलीये. भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही टीम्स फायनलच्या सामन्यात एकमेकांसमोर येणार आहे. टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये इंग्लंडला हरवून अंतिम फेरीत स्थान मिळवलंय. तर न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला हरवून फायनलपर्यंत मजल मारली.
दरम्यान आता दोन्ही वर्ल्ड कपच्या ट्रॉफीसाठी भिडण्यास सज्ज आहेत. वर्ल्डकपचा अंतिम सामना रविवारी ८ मार्च २०२६ रोजी जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामन्यासाठी टॉस संध्याकाळी ६:३० वाजता होणार आहे. सामन्याचा पहिला चेंडू संध्याकाळी ७:०० वाजता टाकला जाईल. या हाय-व्होल्टेज सामन्याला मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.
टीम इंडियाकडे यावेळी इतिहास रचण्याची उत्तम संधी आहे. जर भारताने हा सामना जिंकला तर आपण तिसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकप जिंकू शकतो. तर सलग दुसऱ्यांदा भारत टी-२० वर्ल्डकप उचलणार आहे.
न्यूझीलंड देखील उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्यांनी सेमीफायनलच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला मोठ्या फरकाने हरवून अंतिम फेरी गाठली. टीमचं नेतृत्व मिचेल सँटनर करत असून आतापर्यंत त्यांनी केलेल्या कामगिरीचं कौतुक होतंय.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी२० वर्ल्डकप २०२६ चा अंतिम सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर टीव्हीवर थेट पाहता येणार आहे. याव्यतिरिक्त, सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ हॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर मोबाइल आणि ऑनलाइन प्रेक्षकांसाठी उपलब्ध असणार आहे.
अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर.
टिम सेफर्ट (वर्ल्डकप), फिन ऍलन, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, मिशेल सँटनर (कर्णधार), कोल मॅककोंची, मॅट हेन्री, ईश सोढी, लॉकी फर्ग्युसन, जेम्स नीशम, जेकब डफी, काइल जेमिसन, डेव्हॉन कॉन्वे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.