T20 world cup semifinal: ना सॅमसन, ना अक्षर, ना बुमराह -शिवम...; हा खेळाडू ठरला टीम इंडियाचा इम्पॅक्ट प्लेअर

Ishan kishan named impact player after india semifinal win: टी२० वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये भारताने न्यूझीलंडचा ७ विकेट्सने पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला. या विजयानंतर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये इशान किशनला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून घोषित करण्यात आलं.
T20 world cup semifinal
T20 world cup semifinalsaam tv
Published On

यंदाच्या टी-२० वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाने फायनलचं तिकीट मिळवलंय. गुरुवारी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सेमीफायनलमध्ये भारताने न्यूझीलंडचा ७ विकेट्सने पराभव करत फायनल गाठलीये. दरम्यान या सामन्यात टीम इंडियाच्या प्रत्येक खेळाडूने त्याच्या परीने चांगला खेळ केला. दरम्यान प्रथेप्रमाणे विजयानंतर ड्रेसिंग रूममध्ये इम्पॅक्ट प्लेअर निवडला जातो. या सामन्यानंतरचा इम्पॅक्ट प्लेअर कोण ठरला ते पाहूयात.

सेमीफायनलच्या सामन्यानंतर ड्रेसिंगरूममध्ये टीम इंडियाचा मुख्य कोच गौतम गंभीरने सर्व खेळाडूंचं कौतुक केलं. कठीण परिस्थितीत टीमने चांगला खेळ दाखवला असल्याचं, गौतमने म्हटलंय. गंभीरनंतर टीमचे फिजियोथेरेपीचे हेड कमलेश जैन यांनी इम्पॅक्ट प्लेअरची घोषणा केली. टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये इशान किशनच्या नावावर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून शिक्कामोर्तब करण्यात आलं.

कमलेश जैन यांनी सांगितलं की, आजचा इम्पॅक्ट प्लेअर हा विश्वास, कठोर परिश्रम आणि कणखरपणा असलेला खेळाडू आहे. तो गेल्या २ वर्षांपासून टीमचा भागही नवह्ता. मात्र त्याला विश्वास होता की, जेव्हाही तो टीममध्ये कमबॅक करेल तेव्हा तो त्याचा इम्पॅक्ट दाखवेल.

जैन पुढे म्हणाले की, त्याने डोमेस्टिक क्रिकेटमध्ये गेले २ वर्ष खूप मेहनतीने चांगली कामगिरी केली आहे. यावेळी तो मानसिक दृष्याही खंबीर राहिला. त्यामुळे ज्यावेळी त्याला संधी मिळाली तेव्हा त्याने त्याचं सोनं केलं. त्यामुळे आजचा इम्पॅक्ट प्लेअर इशान किशन आहे.

T20 world cup semifinal
Arjun Tendulkar Wedding : शुभमंगल सावधान! सचिनच्या लेकाचं झालं लग्न, अर्जुन-सानियानं घेतले सातफेरे, पाहा व्हिडिओ

दरम्यान इम्पॅक्ट प्लेअर म्हणून निवड झाल्यानंतर इशाननेही सर्वांचे आभार मानले. शिवाय प्रत्येकाने खूप चांगला खेळ केला असंही त्याने सांगितलंय.

T20 world cup semifinal
IND vs ENG Semi Final: इंग्लंडने जिंकला टॉस; टीम इंडियाविरूद्ध पहिल्यांदा करणार गोलंदाजी, पाहा भारताची प्लेईंग ११

इशान-किशनची चांगली कामगिरी

जवळजवळ अडीच वर्षांनी टीम इंडियात परतल्यानंतर इशान किशनने चांगली फलंदाजी केली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० सिरीजमध्येही त्याची फलंदाजीची कामगिरी चांगली होती. त्यानंतर बॅकअप ओपनर म्हणून निवड झाल्यानंतरही त्याने २०२६ च्या टी-२० वर्ल्डकपसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवलंय.

T20 world cup semifinal
Viral Video: अगं बाई बस खाली...! बुमराहच्या गोलंदाजीवर साक्षीचं रिएक्शन व्हायरल, धोनीलाही हसू आवरेना

इशानने वर्ल्डकपमध्येही हा फॉर्म कायम ठेवला. जवळजवळ प्रत्येक सामन्यात त्याने चांगले रन्स केले. उपांत्य फेरीतही ज्यावेळी टीमला त्याची गरज होती तेव्हा त्याने निराश केलं नाही. धमाकेदार खेळी करत या वर्ल्डकपमध्ये भारताचा सर्वात यशस्वी फलंदाज बनला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com