Pakistan Cricket Team: पाकिस्तानी खेळाडूचं हाउसकीपिंग महिलेसोबत नको ते कृत्य; वर्ल्डकपदरम्यान हॉटेलमध्ये घडली घटना

Surabhi Jayashree Jagdish

पाकिस्तानी खेळाडू

टी-२० वर्ल्डकपदरम्यान श्रीलंकेतील कॅंडीमध्ये पाकिस्तान टीमच्या एका खेळाडूवर हॉटेलमधील महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप झालाय. या घटनेमुळे टीम मॅनेजमेंटमध्ये खळबळ उडाली. संबंधित खेळाडूचं नाव मात्र जाहीर करण्यात आलेले नाही

Pakistan player misconduct

सामना होण्यापूर्वीची घटना

हा प्रकार श्रीलंकेविरुद्धच्या सुपर-८ सामन्याच्या आधी घडल्याची माहिती आहे. सध्या पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि टीममध्ये या घटनेबद्दल चर्चा सुरू आहे. ‘टेलिकॉम एशिया स्पोर्ट’च्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे.

Pakistan cricket news

मदतीसाठी महिलेचा आरडाओरडा

सूत्रांच्या माहितीनुसार, त्या खेळाडूने हॉटेलमधील महिला हाऊसकीपिंग कर्मचाऱ्याशी गैरवर्तन केलं. घाबरलेल्या कर्मचाऱ्याने मोठ्याने ओरडून मदत मागितली. त्यानंतर हॉटेलच्या इतर कर्मचाऱ्यांनीतिची सुटका केली.

cricketer misbehaviour report

टीम मॅनेजरकडे तक्रार

घटनेची माहिती लगेचच पाकिस्तान टीमचे मॅनेजर नवैद चीमा यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आली. हॉटेल प्रशासनाने या प्रकारावर कडक कारवाईची मागणी केली होती. मात्र टीम मॅनेजमेंटने प्रकरण शांततेत मिटवण्याचा प्रयत्न केला.

Pakistan team controversy

खेळाडूवर दंडाची कारवाई

अहवालानुसार, मॅनेजर नवैद चीमा यांनी त्या खेळाडूच्या वतीने माफी मागितली. त्यानंतर संबंधित खेळाडूवर गैरवर्तनाबद्दल दंड ठोठावण्यात आला. त्यामुळे हॉटेल मॅनेजमेंटने प्रकरण पुढे न वाढवण्याचा निर्णय घेतला.

Sri Lanka hotel incident

पुढील कारवाई

पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्धचा सामना पाच रन्सने जिंकला होता. मात्र नेट रनरेटच्या आधारे टीमला सेमीफायनल गाठता आली नाही. आता त्या खेळाडूला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या शिस्तभंग समितीसमोरही हजर राहावं लागण्याची शक्यता आहे.

Pakistan player allegation

यापूर्वीही गैरवर्तनाच्या घटना

परदेश दौऱ्यांदरम्यान पाकिस्तानच्या खेळाडू आणि सपोर्ट स्टाफवर गैरवर्तनाचे आरोप आधीही झाले आहेत. गेल्या वर्षी इंग्लंड दौऱ्यावर युवा फलंदाज हैदर अलीवर बलात्काराचा आरोप झाला होता.

T20 World Cup news

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराज दाढी का ठेवायचे? जाणून घ्या कारणं

cultural symbolism of shivaji maharaj beard
येथे क्लिक करा