India vs Pakistan: भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने; एशियन गेम्सच्या फायनलमध्ये रंगणार महामुकाबला, जाणून घ्या कुठे पाहता येणार सामना?

India vs Pakistan final: भारत आणि पाकिस्तान यांच्यात एशियन गेम्स 2026 पुरुष क्रिकेटचा सुवर्णपदक सामना 3 ऑक्टोबरला होणार आहे. सामना सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे.
India vs Pakistan
India vs Pakistansaam tv
Published On: 

आज भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर आमनेसामने येणार आहेत. एशियन गेम्समधील पुरुष क्रिकेटच्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. भारताने उपांत्य फेरीत श्रीलंकेचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर पाकिस्तानने बांगलादेशवर मात करत अंतिम फेरी गाठलीये.

त्यामुळे आता दोन्ही देशांमधील या सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागलंय. हा सामना नेमका कधी होणार, किती वाजता सुरू होणार आणि टीव्ही तसेच मोबाईलवर तो कुठे पाहता येणार, याची माहिती जाणून घेऊया.

India vs Pakistan
Asian Games 2026: शूट-ऑफमध्ये दक्षिण कोरियाला हरवत भारताचा थरारक विजय; साहिल-चिकिताने जिंकले गोल्ड

श्रेयस अय्यरकडे टीम इंडियाची धुरा

एशियन गेम्सच्या फायनलमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व श्रेयस अय्यर करणार आहे. तर पाकिस्तान टीमची जबाबदारी साहिबजादा फरहान याच्याकडे सोपवण्यात आली आहे. भारताने सेमी फायनलच्या सामन्यात श्रीलंकेचा तब्बल 124 रन्सने पराभव केला. दुसरीकडे पाकिस्तानने बांगलादेशचा 6 विकेट्सने पराभव करत अंतिम सामन्यात धडक मारली.

आज म्हणजेच 3 ऑक्टोबर रोजी एशियन गेम्समध्ये दोन पदकांचे सामने होणार आहेत. यातील पहिला सामना कांस्यपदकासाठी होणार आहे. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात गोल्ड मेडलसाठी सामना रंगणार आहे.

India vs Pakistan
Rohit Sharma: ‘मला जिंकण्याचा तो अनुभव पुन्हा हवाय’; 2027 वर्ल्ड कपबाबत रोहित शर्माने सांगितली मनातली इच्छा

भारत-पाकिस्तान सामना सकाळी 10 वाजता सुरू होणार

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुवर्णपदकाचा सामना शनिवार, 3 ऑक्टोबर रोजी होणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 10 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. त्याआधी सकाळी 9.30 वाजता टॉस होणार आहे. सकाळी 10 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. हा सामना साधारण दुपारी 1 वाजेपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना असल्याने हा सामन्यात कधीही सामना फिरू शकतो. त्यामुळे चाहत्यांना या सामन्यात चांगलाच थरार पाहायला मिळणार आहे. याच दिवशी सकाळी 5.30 वाजता कांस्यपदकासाठी सामना रंगला.

India vs Pakistan
Asian Games: भारताच्या लेकींनी रचला इतिहास! चीनचा पराभव, ४४ वर्षांनंतर हॉकीत सुवर्णपदक

भारत-पाकिस्तान सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येणार?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना टीव्हीवर पाहायचा असेल, तर तो सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या टीव्ही चॅनेल्सवर पाहता येणार आहे. तर मोबाईल, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही किंवा टॅबलेटवर सामना पाहण्यासाठी सोनी लिव्ह अॅपचा वापर करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com