

हार्दिक पांड्या पहिल्याच चेंडूवर बाद
गौतम गंभीरची नाराजी सोशल मीडियावर व्हायरल
भारताने २० षटकांत १७५ धावा केल्या
पाकिस्तानविरुद्धच्या टी-२० विश्वचषक सामन्यात हार्दिक पांड्या फक्त एक चेंडू खेळू शकला. सॅम अयुबने त्याला पहिल्याच चेंडूवर तंबूत परत पाठवलं. हार्दिक पांड्या भारतीय संघाचा कणा आहे. तो मधल्या फळीतील फलंदाज आहे. हार्तिक बाद होताच मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर कमालीचा नाराज झाला. गंभीरची रिअॅक्शन सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली. दरम्यान गंभीरची नाराजी ही जास्त वेळ राहिली नाही. आपल्या खेळीवर गंभीर नाराज झाल्याचं समजल्यानंतर हार्दिकनं गंभीरला कोचला आपल्या गोलंदाजीनं खूश केलं.
टी-२० विश्वचषकातील २७ वा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोलंबो येथे खेळला जातोय. या सामन्यात टीम इंडियाने २० षटकांत ७ गडी गमावून १७५ धावा केल्या. टी-२० विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध भारताची ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. या सामन्यात इशान किशन जबरदस्त फलंदाजी केली. त्याने ४० चेंडूत ७७ धावा केल्या. १
१५ व्या षटकात भारताला तिसरा धक्का तिलक वर्माच्या रुपात मिळाला. त्याच पुढच्याच चेंडूवर हार्दिक बाद झाला. सॅम अयुबने त्याला बाद केले. हार्दिकला त्याचे खाते उघडता आले नाही. हार्दिकची विकेट पाहिल्यानंतर गौतम गंभीर खूप नाराज झाला. मात्र हार्दिकनं आपल्या गोलंदाजीवर कोच गंभीरचं मन जिंकलं. भारतीय संघाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाकिस्तान संघाची सुरुवात खूपच खराब झाली. पाकिस्तान संघाने शुन्य धावांवर आपली पहिली विकेट गमावली. भारतीय संघाकडून हार्दिक पांड्याने पहिलं षटक टाकलं. भारताने दिलेल्या १७६ धावांचे आव्हान पार करण्यासाठी पाकिस्तानकडून साहिबजादा फरहान आणि सईम अयुब ही जोडी मैदानात उतरली.
पण हार्दिकने फरहानला बाद केलं आणि त्याला खातेही उघडू दिले नाही. अंपायरनं बाद करार देताच एकच जल्लोष झाला. त्यावेळी हार्दिकच्या फलंदाजीवर नाराज झालेला गौतम गंभीर खूश झाला. त्याने आनंदाने टेबलावर हात मारत टाळ्या वाजवल्या.
भारताने १४ षटकांत दोन गडी गमावून १२५ धावा केल्या होत्या. त्यावेळी १५ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर सॅम अयुबने तिलक वर्मा बाद केलं. तिलकने २४ चेंडूत २५ धावांची संथ खेळी केली. तो अयुबच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू म्हणजेच पायचीत झाला. त्यानंतर मैदानावर हार्दिक पांड्याला, तो मोठे फटके मारून आणि सूर्यकुमार यादवसोबत शेवटच्या ५ षटकांत भारताला उत्तम धावसंख्या मिळवून देईल. टीम इंडियाचा धावफलक वेगाने धावेल, अशी अपेक्षा होती, पण तसे झाले नाही.
हार्दिकने पहिल्याच चेंडूवर लाँग-ऑफवर षटकार मारण्याचा प्रयत्न केला. परंतु सॅम अयुबच्या कॅरम बॉलचा अंदाज आला नाही. चेंडू हवेत उंच गेला आणि लाँग-ऑफवर उभ्या असलेल्या बाबर आझमने त्याचा झेल घेतला. हार्दिक आपले खाते न उघडताच बाद झाला. ड्रेसिंग रूममध्ये बसलेला गंभीर दोन चेंडूंमध्ये दोन मोठ्या विकेट्स पाहून अस्वस्थ झाला. तो कमालीचा नाराज झाला. त्याची रिअॅक्शन सोशल मीडियावर व्हायरल झाली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.