IND vs ENG Womens 1st Test: भारतीय क्रिकेट महिला संघाचा धूमधडाका; पहिल्याच दिवशी ठोकल्या ४१०धावा

IND vs ENG : भारत आणि इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघात कसोटी सामना खेळला जात आहे. पहिल्याच दिवशी भारतीय संघाने ४०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. ८८ वर्षानंतर पहिल्या दिवशी ४०० धावा करण्याचा विक्रम भारतीय संघाने केलाय. याआधी इंग्लंडच्या संघाने हा विक्रम केलाय.
IND vs ENG
IND vs ENG X
Published On

IND vs ENG Womens 1st Test Team scored 410 Runs :

भारत आणि इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघात कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय महिला फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केलीय. पहिल्या दिवशी भारतीय संघाने ४१० धावा ठोकल्या आहेत. चार खेळाडूंच्या अर्धशतकांच्या जोरावर भारतीय संघाने ही धावसंख्या उभारलीय. (Latest News)

पहिल्याच दिवशी ४०० पेक्षा जास्त धावा करणारा भारतीय संघ दुसरा संघ बनलाय. १९३५ मध्ये हा विक्रम आधी झाला होता. ८८ वर्षानंतर पहिल्यांदाच महिला कसोटी संघाने एका दिवसात ४०० पेक्षा जास्त धावा केल्या. याआधी हा विक्रम इंग्लंडच्या नावावर आहे. क्राइस्टचर्चमधील लँकेस्टर पार्क येथे १९३५ मध्ये इंग्लंडच्या संघाने न्यूझीलंडविरुद्ध ४३१ धावा केल्या होत्या. दरम्यान चार खेळाडूंच्या अर्धशतकांच्या जोरावर भारतीय संघाने ४१०/७ धावसंख्या केली. दिवसाचा खेळ संपला होता तेव्हा भारतीय संघाने ४१० धावा करत ७ विकेट गमावल्या आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सध्या धावपट्टीवर दिप्ती शर्मा नाबाद ६०, तर पुजा वस्त्रकार ४ धावांवर खेळत आहे. जबरदस्त फलंदाजी करत भारताने सर्वोच्च धावसंख्या केलीय. यापूर्वी ही भारतीय संघाने अशीच मोठी धावसंख्या २१०४ मध्ये उभारली होती. हा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झाला होता, त्यावेळी भारतीय संघाने ४००/९ अशी धावसंख्या उभारली होती.

भारतीय संघाने आजचा डाव २६१ पासून सुरू झाला होता. त्यावेळी भारतीय संघाने ४ विकेट गमावल्या होता. हरमनप्रीत कौर आणि यास्तिका भाटिया आजच्या डावाला सुरुवात केली. या दोघांनी विकेटची गळती थांबवली. कौरने संयम खेळी करत विकेट राखून ठेवली. तर यास्तिकाने फटकेबाजी करत भारताला ६२ षटकांत ३०० धावांचा टप्पा पार करून दिला.

यास्तिकाने अंतिम सत्रात शानदार अर्धशतक ठोकलं. दीप्ती शर्मा आणि स्नेह राणा यांनी चिकट खेळी करत इंग्लिश गोलंदाजांचा घाम काढला. या दोघांनी ९० पेक्षा जास्त धावांची भागिदारी केली होती. नॅट सायव्हर-ब्रंटने राणाला बाद केलं. दरम्यान भारताने पहिल्या दिवशी ४१० करण्यासाठी ९४ षटके खेळली.

IND vs ENG
AUS vs PAK, 1st Test: करिअरच्या अखेरच्या कसोटीत डेविड वॉर्नरचा जलवा; झळकावलं २६वं शतक

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com