ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा स्टार सलामीवीर डेविड वॉर्नरने पाकिस्ताविरुद्धच्या कसोटी सामन्यात शतक झळकावलं. आपल्या करिअरच्या अखेरच्या कसोटी सामन्यात वॉर्नरने २६ शतक करत सर्व टीकाकारांची तोंड बंद केली. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाच्या संघात पर्थ येथील ऑप्टस स्टेडियमवर तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर वॉर्नरने आपल्या करिअरमधील २६ वं शतक ठोकलं. यात १४ चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. (Latest News)
वॉर्नरने केला विक्रम
या शतकाने वॉर्नरच्या नावाचा समावेश कसोटी सामन्यात २६ शतक करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत झालाय. शतक झळाकावल्यानंतर वॉर्नरने सर गॅरी सोबर्स यांच्याशी बरोबरी केलीय. सोबर्स यांनी आपल्या कसोटी करिअरमध्ये ९३ वे सामने खेळले आहेत, यात त्यांनी २६ शतकं केली आहेत. दरम्यान वॉर्नर आपल्या करिअरमधील ११० वा कसोटी सामना खेळत आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
या सामन्यात शतक करत वॉर्नरने पाकिस्तानचा माजी कर्णधार (captain) इंझमाम उल-हकला मागे टाकले आहे. इंझमामने १२० कसोटी सामन्यात २५ शतकं केली आहेत. पाकिस्तानी खेळाडूला मागे सोडल्यानंतर वॉर्नर आता ऑस्ट्रेलियाचा (Australia) माजी क्रिकेटर (Cricketer) अॅलन बॉर्डरचा विक्रम तोडण्याच्या तयारीत आहे. बॉर्डर यांनी १५६ कसोटी सामने खेळत २७ शतकं केली आहेत.
टीकाकारांची तोंड केली बंद
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून डेविड वॉर्नर आऊट ऑफ फॉर्म होता. यामुळे त्याच्यावर टीका केली जात होती. याचदरम्यान वॉर्नरने शतक झळकावल्याने सर्व टीकाकारांची तोंड बंद झाली आहेत. आपल्या दमदार खेळीने वॉर्नरने संघ व्यवस्थापक आणि निवड समितीचे अध्यक्ष जॉर्ज बेली यांचा विश्वास सार्थ ठरवला. आऊट ऑफ फॉर्म असल्यानं वॉर्नरवर टीका होत असताना बेली यांनी त्याला संघात घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला होता.
कोणी केली होती टीका
कसोटी सामन्यात शतक करण्यासाठी वॉर्नरला एक वर्षापेक्षा जास्त काळ लागला. मागील चार वर्षात वार्नरने फक्त ३ शतक केली आहेत. या तीन शतकात पर्थ येथे केलेल्या शतकाचा समावेश आहे. दरम्यान पाकिस्तानविरुद्धची कसोटी मालिका सुरू होण्याआधी वॉर्नरच्या निवडीवरून टीका केली जात होती.
ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटी सामन्यांचा गोलंदाज मिशेल जॉनसननेही वॉर्नरवर टीका केली होती. वॉर्नर हा अनुभवी खेळाडू आहे, परंतु तो गेल्या काही दिवासांपासून खराब कामगिरी करत आहे. तो आता निवृत्ती घेणार आहे, अशा खेळाडूची कसोटी मालिकेसाठी का निवड करण्यात आली असा सवाल त्याने केला होता. वॉर्नरने चेंडूसोबत केलेली छेडछाडचा मुद्दा उपस्थित करत जॉनसन म्हणाला की, वॉर्नर निवृत्तीची घोषणा करण्याचा हक्कदार आहे.
सर्वाधिक धावा करणारे कसोटी सलामीवीर
सुनील गावस्कर - ३३ कसोटी शतक
एलिस्टेअर कूक- ३१ कसोटी शतकं
मॅथ्यू हेडन- ३० कसोटी शतकं
ग्रीम स्मिथ - २७ शतकं
डेविड वॉर्नर - २६ शतकं
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.