ENG vs PAK: इंग्लंडचा शेवट गोड! दारुण पराभवानंतर पाकिस्तानची WC मधून एक्झिट तर इंग्लंड चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र

ENG vs PAK: इंग्लंडच्या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ इतक्या २४४ धावांवर ढेपाळला. इंग्लंडने ९३ धावांच्या फरकांनी सामना जिंकला.
ENG vs PAK:
ENG vs PAK: Saam tv
Published On

ENG vs PAK:

विश्वचषकात इंग्लंड विरुद्ध पाकिस्तानचा ४४ वा सामना झाला झाला. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत ३३७ धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ इतक्या २४४ धावांवर ढेपाळला. इंग्लंडने ९३ धावांच्या फरकांनी सामना जिंकला. इंग्लंड संघ सामना जिंकल्याने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र झाला आहे (Latest Marathi News)

इंग्लंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. डेव्हिड व्हिलीने पहिल्या षटकात पाकिस्तानला पहिला झटका दिला. फखर एका धावांवर बाद झाला. फखर बाद झाल्यानंतर बाबर आझम आणि रिझवानने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना फारसं यश आलं नाही.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ENG vs PAK:
AUS vs BAN: मार्श-स्मिथचा मैदानावर झंझावात; ऑस्ट्रेलियाचा बांगलादेशवर सर्वात मोठा विजय

बाबरने ४५ चेंडूत ३८ धावा करून तंबूत परतला. त्यानंतर रिझवान ३६ धावांवर बाद झाला. रिझवाननंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का बसला. शकील २९ धावांवर बाद झाला. इफ्तिखारने तीन तर शादाबने चार धावा केल्या. शाहीदने २५ धावांवर बाद झाला. तर शेवटच्या विकेटसाठी वसीम आणि रऊफने ५३ धावांची भागादारी रचली.

ENG vs PAK:
Babar Azam Captaincy: वर्ल्डकपच्या अपयशानंतर पाकिस्तान संघात होणार मोठा बदल! बाबर आझम कर्णधारपदाचा राजीनामा देणार?

इंग्लंडने पाकिस्तानच्या विरोधात प्रथम फलंदाजी करताना जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स आणि जो रुटने अर्धशतकीय खेळी खेळली. इंग्लंडने ५० षटकात नऊ गडी गमावून ३३७ धावा केल्या. इंग्लंडसाठी बेन स्टॉक्सने ७६ चेंडूत ८४ धावा चोपल्या. पाकिस्तानसाठी हारिस रऊफने तीन तर शाहीदने दोन गडी बाद केले.

पाकिस्तानचा गेम ओव्हर

पाकिस्तानला सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी प्रथम फलंदाजी करायची गरज होती. पाकिस्तानला प्रथम फलंदाजी करून मोठी धावसंख्या उभारायची होती. पाकिस्तानला सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी २८७ धावांनी विजय मिळवायचा होता. मात्र, पाकिस्तानच्या ऐवजी इंग्लंडने नाणेफेक जिंकल्याने तेव्हाच पाकिस्तानचं विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com