T20 World Cup 2024: ICC ने निवडलेल्या प्लेइंग 11 मधून विराट गायब;  टीम इंडियाच्या या 6 खेळाडूंना मिळालं स्थान!
rohit sharma with virat kohlitwitter

T20 World Cup 2024: ICC ने निवडलेल्या प्लेइंग 11 मधून विराट गायब; टीम इंडियाच्या या 6 खेळाडूंना मिळालं स्थान!

ICC Playing 11, T20 World Cup 2024: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा झाल्यानंतर आयसीसीने सर्वोत्तम प्लेइंग ११ निवडली आहे.
Published on

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील फायनलमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेवर ७ धावांनी विजय मिळवला आणि दुसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरलं.

भारतीय संघाने २००७ मध्ये पहिल्यांदा जेतेपदावर नाव कोरलं होतं. त्यानंतर १७ वर्षांची प्रतीक्षा संपवत भारतीय संघाने दुसऱ्यांदा जेतेपदाला गवसणी घातली आहे. दरम्यान ही स्पर्धा झाल्यानंतर आयसीसीने स्पर्धेतील सर्वोत्तम ११ खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. या संघात ६ भारतीय खेळाडूंना स्थान देण्यात आलं आहे.

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत भारतीय संघाने एकही सामना गमावला नाही. यासह खेळाडूंनीही शानदार कामगिरी केली. या संघात भारतीय संघातील ६ खेळाडूंना स्थान देण्यात आलं आहे. तर अफगाणिस्तानच्या ३, ऑस्ट्रेलिया आणि वेस्टइंडिजच्या १-१ खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.

T20 World Cup 2024: ICC ने निवडलेल्या प्लेइंग 11 मधून विराट गायब;  टीम इंडियाच्या या 6 खेळाडूंना मिळालं स्थान!
Rohit Sharma, IND vs SA: हाच फरक आहे.. मार्शने ट्रॉफीवर पाय ठेवला, रोहितने खेळपट्टीची पवित्र माती चाखली - VIDEO

भारतीय संघाकडून फलंदाजी करताना रोहित शर्माने सर्वाधिक धावा केल्या. तर अफगाणिस्तानचा फलंदाज रहमानुल्लाह गुरबाज या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. वेस्टइंडिजचा आक्रमक फलंदाज निकोलस पूरन या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. तर सूर्यकुमार यादवला चौथे स्थान देण्यात आले आहे.

T20 World Cup 2024: ICC ने निवडलेल्या प्लेइंग 11 मधून विराट गायब;  टीम इंडियाच्या या 6 खेळाडूंना मिळालं स्थान!
IND vs SA, Final: कर्णधार असावा तर असा! रोहितने घेतलेल्या या 3 मोठ्या निर्णयांनी टीम इंडियाला बनवलं चॅम्पियन

या संघात ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टोइनिसला पाचवे स्थान देण्यात आले आहे. तर भारताचा उपकर्णधार सहाव्या स्थानी आहे. सातव्या स्थानी अक्षर पटेलला स्थान दिलं गेलं आहे. अफगाणिस्ताना कर्णधार राशिद खानने आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर सातवे स्थान मिळवले आहे. तर प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कार पटकावणारा जसप्रीत बुमराहला या संघात नववे स्थान देण्यात आले आहे.

तर अर्शदीप सिंगला दहाव्या आणि फजहलक फारुकीला अकराव्या स्थानी स्थान देण्यात आलं आहे. मुख्य बाब म्हणजे विराट कोहली यावेळी आयसीसीच्या प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळवण्यात अपयशी ठरला आहे.

अशी आहे आयसीसीने निवडलेली सर्वोत्तम प्लेइंग ११:

रोहित शर्मा, रहमानुल्ला गुरबाज, निकोलस पूरन, सूर्यकुमार यादव, मार्कस स्टोइनिस, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, राशिद खान, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, फजलहक फारूकी.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com