Cricketer Death : पंजाब किंग्जच्या माजी क्रिकेटपटूचं ३७ व्या वर्षी निधन, क्रिकेटविश्वात शोककळा

amanpreet singh gill passes away : पंजाब किंग्जचा माजी क्रिकेटपटू अमनप्रीत सिंग गिलचं ३७ व्या वर्षी निधन झालं. गिलच्या निधनानं क्रिकेट विश्वात शोककळा पसरली.
पंजाब किंग्जच्या माजी क्रिकेटपटूचं अवघ्या ३७ व्या वर्षी निधन
PBKS Player amanpreet singh gill passes awaySocial Media
Published On

PBKS Cricketer Passes Away : आयपीएल स्पर्धा सुरू असतानाच पंजाब किंग्जच्या माजी क्रिकेटपटूचं अवघ्या ३७ वर्षीय निधन झालं. अमनप्रीत सिंग गिल असं या क्रिकेटपटूचं नाव आहे. अमनप्रीत सिंग गिलच्या निधनानं क्रिकेटविश्वात हळहळ व्यक्त होत आहे. पंजाब किंग्जनं अमनप्रीतच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं. त्यानं आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज संघाचं दोन पर्वांत प्रतिनिधीत्व केलं होतं.

अमनप्रीत सिंह गिल याचं आज, ६ मे २०२६ रोजी निधन झालं. तो अवघ्या ३७ वर्षांचा होता. या घटनेनं पंजाब किंग्ज आणि क्रिकेट विश्वात शोककळा पसरली. पंजाब क्रिकेट असोसिएशननं (PCA) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर करून ही माहिती दिली. पंजाब किंग्ज संघ व्यवस्थापनाने अमनप्रीतच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

पंजाब क्रिकेट असोसिएशन, पंजाबचा माजी क्रिकेटपटू आणि पंजाबच्या निवड समितीचे सदस्य अमनप्रीत सिंग गिल यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत आहोत. त्यांनी पंजाब क्रिकेटची सेवा केली. इंडिया अंडर १९, किंग्ज इलेव्हन पंजाब अर्थात पंजाब किंग्ज या संघांचं प्रतिनिधीत्व केलं होतं. त्याचे कुटुंबीय आणि नातेवाइकांपबद्दल आम्ही संवेदना व्यक्त करतो. या कठीण काळात त्यांच्या कुटुंबीयांना सावरण्याची शक्ती द्यावी, अशी प्रार्थना आम्ही करतो, अशा शब्दांत पंजाब क्रिकेट असोसिएशनने श्रद्धांजली वाहिली.

पंजाब किंग्जच्या माजी क्रिकेटपटूचं अवघ्या ३७ व्या वर्षी निधन
Indian footballer death news खेळताना अचानक मैदानावर कोसळला, २५ वर्षाच्या खेळाडूचा मृत्यू, क्रीडा विश्वावर शोककळा

अमनप्रीत सिंग गिलची क्रिकेट कारकीर्द

अमनप्रीत सिंग गिल याचा १६ सप्टेंबर १९८९ रोजी जन्म झाला होता. अमनप्रीत हा अष्टपैलू क्रिकेटपटू होता. गोलंदाजी आणि मधल्या फळीत फलंदाजी करणाऱ्या अमनप्रीत यानं पंजाब संघ आणि इंडिया अंडर १९ संघाचं प्रतिनिधीत्व केलं होतं. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तो सहा सामने खेळला होता. अमनप्रीतला २००९ मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब (आता पंजाब किंग्ज) मध्ये त्याची निवड झाली होती. २०१० पर्यंत तो संघाचा भाग होता. या काळात युवराज सिंग, माहिला जयवर्धने आणि ब्रेट ली यांसारख्या दिग्गज खेळाडूंकडून त्यानं क्रिकेटचे धडे घेतले. मात्र, त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com