Indian footballer death news खेळताना अचानक मैदानावर कोसळला, २५ वर्षाच्या खेळाडूचा मृत्यू, क्रीडा विश्वावर शोककळा

भारतीय फुटबॉलपटू रविंद्र सिंह यांचे सामन्यादरम्यान अचानक निधन झाले. पंजाबमधील फुटबॉल स्पर्धेत खेळताना त्यांना छातीत वेदना जाणवल्या आणि ते मैदानावर कोसळले.
Ravinder Singh Die
Ravinder Singh DieSAAM TV
Published On

भारतीय फुटबॉलपटू रविंद्र सिंह याचं अचानक निधन झालं आहे. त्याच्या निधनाच्या या घटनेमुळे भारतीय फुटबॉल विश्वाला मोठा धक्का बसलाय. पंजाबमधील नवांशहर जिल्ह्यातील बछौरा गावात रविंद्र सिंह एका फुटबॉल स्पर्धेत खेळत होता. सामना सुरू असताना त्याला अचानक छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. या वेदनांनी तो मैदानावर कोसळला.

तातडीने रूग्णालयात केलं दाखल

सहकारी खेळाडूंनी तात्काळ त्याला जवळच्या खासगी रुग्णालयात नेलं. मात्र रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. मिळालेल्या माहितीनुसार, रविंद्र सिंह याचा मृत्यू हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जातेय. तरीही त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण वैद्यकीय तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे.

कोण होते रविंद्र सिंह?

रविंद्र सिंह हे पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील मजरी गावात राहणारे होते. तो इंडियन फुटबॉल लीगमध्ये खेळणाऱ्या नामधारी एफसी या क्लबशी करारबद्ध होता. अवघ्या वयाच्या २५ व्या त्याच्या निधनाने सर्वजण हळहळले. मैदानावर तो डिफेंडरच्या भूमिकेत खेळत होता. एफसीच्या डिफेंडरमध्ये तो एक महत्त्वाचा खेळाडू मानला जात होता.

Ravinder Singh Die
Kavya Maran trolling: सनरायझर्सचा निर्णय वादात; अबरार अहमदला खरेदी केल्याने काव्या मारन ट्रोल, सोशल मीडिया अकाऊंटही सस्पेंड

हिंदुस्तान टाइम्सच्या माहितीनुसार, रविंद्र सिंह हा गढशंकर इथल्या बब्बर अकाली मेमोरियल खालसा कॉलेजमध्ये बीएचे शिक्षण घेत होता. ते सध्या बीएच्या दुसऱ्या वर्षात शिकत असल्याची माहिती आहे.

Ravinder Singh Die
VIDEO: हळद लावली, पाया पडला आणि...! कुलदीच्या हळदी समारंभात चहलची मस्ती, पाहा व्हिडीओ

क्लबकडून वाहिली श्रद्धांजली

रविंद्र सिंहच्या निधनानंतर त्याच्या क्लब एफसीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून शोक व्यक्त केलाय. त्या पोस्टमध्ये लिहिलं होतं, 'आमचा फुटबॉलपटू रविंद्र सिंह याचं इतक्या कमी वयात अचानक निधन झाल्याची बातमी देताना आम्हाला अत्यंत दुःख होतंय. त्यांचं असं अकाली जाणं हे फुटबॉल विश्वासाठी मोठी हानी आहे. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो. या कठीण काळात त्यांच्या कुटुंबीयांना आणि प्रियजनांना धैर्य आणि शक्ती मिळो.'

Ravinder Singh Die
IPL 2026: आयपीएलपूर्वीच KKR ला 440 वोल्टचा झटका; मॅचविनर खेळाडू IPL 2026 मधून OUT, कोणाची होणार एन्ट्री?

या घटनेनंतर इंडियन फुटबॉल लीगने पुढील फेरीतील सर्व सामन्यांपूर्वी रविंद्र सिंहच्या स्मरणार्थ एक मिनिट मौन पाळण्यात येणार असल्याची, अशी घोषणा केली आहे. तसंच त्याच्या निधनानंतर बेंगळुरू एफसी, मिनर्वा एफसी आणि गोकुलम केरळ या क्लबांनीही शोक व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com