CSK vs RCB: चेन्नईचा पराभव निश्चित! चेपॉकमध्ये RCB मारणार बाजी; माजी खेळाडूने सांगितला मास्टरप्लान

Shane Watson On CSK vs RCB Match: आज होणाऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत.
CSK vs RCB: चेन्नईचा पराभव निश्चित! चेपॉकमध्ये RCB मारणार बाजी; माजी खेळाडूने सांगितला मास्टरप्लान
csk vs rcbsaam tv
Published On

चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे दोन्ही संघ जेव्हा जेव्हा आमनेसामने येतात तेव्हा क्रिकेट चाहत्यांना हाय व्हॉल्टेज सामना पाहायला मिळत असतो. दोन्ही संघात एकापेक्षा एक तगडे खेळाडू आहेत. मात्र गोष्ट जेव्हा होम ग्राऊंडवर खेळण्याची येते, तेव्हा चेन्नईचा संघ कधीच मागे पडत नाही.

चेन्नईने नेहमीच आपला गड राखला आहे. मात्र यावेळी बंगळुरुचा संघ यावेळी चेन्नईला होम ग्राऊंडवर पाणी पाजण्याच्या प्रयत्नात असणार आहे. मात्र हे मुळीच सोपं नसेल. दरम्यान सामन्यापूर्वी माजी अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसनने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला विजयाचा मंत्र दिला आहे.

CSK vs RCB: चेन्नईचा पराभव निश्चित! चेपॉकमध्ये RCB मारणार बाजी; माजी खेळाडूने सांगितला मास्टरप्लान
IPL 2025: CSK vs RCB सामन्यावर पावसाचे सावट? आजचा सामना रद्द होणार? वाचा कसं असेल चेन्नईतील हवामान

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने कोलकाता नाईट रायडर्सला पराभूत करुन शानदार विजयाची नोंद केली आहे. मात्र चेन्नईला हरवणं इतकं सोपं काम नसेल. शेन वॉटसनने जिओ हॉटस्टारवर बोलताना म्हटले की, ' आरसीबीसाठी चेपॉकमध्ये खेळणं हे मोठं आव्हान असेल. चेन्नईकडे एकापेक्षा एक गोलंदाज आहेत. चेन्नईला हरवण्यासाठी आरसीबीला आपल्या संघात बदल करावे लागतील. मात्र कुठलीही चूक अपेक्षित नाही.'

CSK vs RCB: चेन्नईचा पराभव निश्चित! चेपॉकमध्ये RCB मारणार बाजी; माजी खेळाडूने सांगितला मास्टरप्लान
IPL 2025: शतक हुकलं पण डी कॉकने इतिहास रचला! KKR साठी असा रेकॉर्ड करणारा ठरला पहिलाच फलंदाज

शेन वॉटसनकडे चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन्ही संघांकडून खेळण्याचा अनुभव आहे. आरबीसीला विजयाचा कानमंत्र देताना तो म्हणाला, ' चेन्नई सुपर किंग्ज संघातील खेाळाडू शानदार कामगिरी करत आहेत. मुंबईविरुद्ध झालेल्या सामन्यात तिन्ही फिरकी गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली. ते या खेळपट्टीवर फायदेशीर ठरतील.'

CSK vs RCB: चेन्नईचा पराभव निश्चित! चेपॉकमध्ये RCB मारणार बाजी; माजी खेळाडूने सांगितला मास्टरप्लान
IPL 2025 RR vs KKR: क्विंटन डी कॉकच्या झंझावात खेळीने राजस्थानचा धुव्वा; KKR ने उघडलं विजयाचं खातं

या सामन्यासाठी अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११: '

चेन्नई सुपर किंग्ज: ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, सॅम करन, एमएस धोनी (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, नूर अहमद, नॅथन एलिस/मथिशा पाथिराना आणि खलील अहमद.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: विराट कोहली, फिल सॉल्ट (विकेटकीपर), रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, टिम डेव्हिड, कृणाल पंड्या, रसिक दार सलाम/भुवनेश्वर कुमार, सुयश शर्मा, जॉश हेजलवुड, यश दयाल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com