Shane Watson On Mayank Yadav: मयांक यादवबद्दल हे काय बोलून गेला शेन वॉटसन? BCCI ला दिली वॉर्निंग

Mayank Yadav News: मयांक यादव हा गोलंदाज सध्या तुफान चर्चेत आहे. दरम्यान त्याच्याबद्दल बोलताना शेन वॉटसनने मोठं वक्तव्य केलं आहे.
Shane Watson On Mayank Yadav: मयांक यादवबद्दल हे काय बोलून गेला शेन वॉटसन? BCCI ला दिली वॉर्निंग
shane watson statement on mayank yadav said it is not wise to rush to play him in test cricket twitter

Shane Watson On Mayank Yadav:

आपल्या भन्नाट वेगवान गोलंदाजीने मयांक यादवने फलंदाजांची झोप उडवली आहे. त्याची गोलंदाजी पाहून शिखर धवन, स्टीव्ह स्मिथ, ब्रेट ली आणि फाफ डू प्लेसिससारख्या दिग्गज खेळाडूंनी त्याच्या कौतुकाचे पुल बांधले आहेत. सर्वांचं हेच म्हणणं आहे की, या युवा गोलंदाजाला भारतीय संघात स्थान द्या. मात्र ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू शेन वॉटसनचं मत जरा वेगळं आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणारा माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू शेन वॉटसनचं म्हणणं आहे की, जरी त्याने आपल्या वेगवान गोलंदाजीने सर्वांना आकर्षित केलं असलं तरीदेखील त्याला भारतीय कसोटी संघात घेण्यासाठी घाई करणं चुकीचं ठरेल. तो म्हणाला, ' मयांक यादव तुफान चर्चेत आहे. त्याची गोलंदाजी वर्ल्डक्लास आहे. लखनऊ सुपर जायंट्स संघ नशीबवान आहे की, मयांक यादवसारखा गोलंदाज त्यांच्या संघात आहे. मोठ्या स्तरावर जगातील सर्वश्रेष्ठ फलंदाजांसमोर चांगली कामगिरी करणं आणि दबदबा बनवणं अतिशय खास आहे.' (Cricket news in marathi)

Shane Watson On Mayank Yadav: मयांक यादवबद्दल हे काय बोलून गेला शेन वॉटसन? BCCI ला दिली वॉर्निंग
IPL 2024 Points Table: हैदराबादची भरारी, चेन्नईच्या पराभवाचा २ संघांना फटका; गुणतालिकेत झाली मोठी उलथापालथ

तसेच तो पुढे म्हणाला की,'साहजिकच आहे तुम्हाला त्याला कसोटी क्रिकेट खेळताना पाहायला आवडेल. पण, वेगवान गोलंदाज म्हणून ते आव्हानात्मक असेल. कसोटी सामन्यात दिवसातून १५ षटके टाकावी लागतात. ही षटके त्याच गतीने टाकण्याचा दबाव असेल. मला तरी वाटतं की, या टप्प्यावर त्याला कसोटी क्रिकेट खेळवणं शहाणपणाचं ठरणार नाही.'

Shane Watson On Mayank Yadav: मयांक यादवबद्दल हे काय बोलून गेला शेन वॉटसन? BCCI ला दिली वॉर्निंग
RR vs RCB, Playing XI: आज राजस्थान - बंगळुरु भिडणार! कोण मारणार बाजी?

मयांक यादव सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. त्याने आतापर्यंत २ सामने खेळले असून या दोन्ही सामन्यांमध्ये त्याच्या शानदार गोलंदाजीचा जलवा पाहायला मिळाला आहे. पहिल्याच सामन्यात त्याने पंजाब किंग्ज संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने आपल्या दुसऱ्याच षटकात त्याने आयपीएल २०२४ स्पर्धेतील सर्वात वेगवान चेंडू टाकला होता. या सामन्यात गोलंदाजी करताना त्याने ३ गडी बाद केले होते. त्यानंतर पुढील सामन्यातही त्याने ३ गडी बाद करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com