
IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धा ही अर्जुन सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरसाठी अतिशय खास आहे. कारण गेली २ वर्षे अर्जुन तेंडुलकर संघात स्थान मिळवण्याची वाट पाहत होता. अखेर कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात रोहित शर्माने त्याला प्लेइंग ११ मध्ये खेळण्याची संधी दिली आणि त्यानंतर अर्जुन तेंडुलकर हे नाव चर्चेत आलं.
संघात संधी मिळताच अनेकांनी त्याचे कौतुक केले. तर काही लोकांनी त्याला वाडिलांमुळे स्थान मिळाले असे देखील म्हटले आहे. दरम्यान आता शेन वॉटसनने अर्जुनचे कौतुक करत मोठे वक्तव्य केले आहे.
मुंबई इंडियन्सने अर्जुन तेंडुलकरवर बोली लावली त्यावेळी असे म्हटले गेले होते की, सचिन तेंडुलकरमुळे अर्जुनला मुंबईच्या संघात स्थान मिळाले. आता त्याला प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळाल्यानंतर देखील अनेकांनी हेच म्हटले आहे की, सचिन मुळेच त्याला प्लेइंग ११ मध्ये संधी दिली गेली आहे. अनेकांच असं देखील म्हणनं आहे की, जर अर्जुन सचिनचा मुलगा नसता तर त्याला संघात स्थान मिळाले नसते. मात्र शेन वॉटसनचं मत जरा वेगळं आहे. (Latest sports updates)
अर्जुनवर अपेक्षांचं ओझं..
ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू आणि आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये कार्यरत असलेल्या शेन वॉटसनने द ग्रेड क्रिकेटरला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, अर्जुनने आतापर्यंत जोरदार कामगिरी केली आहे.
तो सचिनचा मुलगा आहे. सचिनला भारतात देव मानलं जातं. त्याचा मुलगा म्हणून अर्जुनने स्वतःवर कुठलाही दबाव येऊ दिला नाहीये. त्याच्यावर इतका दबाव आहे ज्याचा आपण अंदाजही लावू शकत नाही.' शेन वॉटसनचं स्पष्ट मत आहे की सचिन तेंडुलकरचा मुलगा असूनही अर्जुनने दबाव न घेता मेहनत घेतली आणि संघात स्थान मिळवलं.
अर्जुन तेंडुलकरने कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध पदार्पण केले होते. या सामन्यात त्याने गोलंदाजी करताना २ षटकात १७ धावा खर्च केल्या होत्या. यादरम्यान त्याला एकही विकेट मिळाली नव्हती.
त्यानंतर हैदराबाद संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याला खेळण्याची संधी दिली गेली होती. या सामन्यात त्याने अप्रतिम गोलंदाजी केली होती. ब्रूक समोर गोलंदाजी करताना त्याने ६ धावा खर्च केल्या होत्या. तर अंतिम षटकात केवळ ५ धावा खर्च करत एक विकेट देखील मिळवली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.