Watch IPL 2023: हसून हसून व्हाल लोटपोट ! तिघांमध्ये टक्कर अन् चाैथ्यानेच घेतला झेल- VIDEO

Trent Boult Catch Video: या सामन्यात ट्रेंट बोल्टने टिपलेला झेल चर्चेचा विषय ठरला
trent boult catch
trent boult catchsaam tv

IPL 2023: गुजरातचच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये हाय व्हॉल्टेज सामना पार पडला. शेवटच्या षटकात या सामन्याचा निकाल लागला. राजस्थान रॉयल्स संघाने या सामन्यात ३ गडी राखुन विजय मिळवला.

यासह राजस्थान रॉयल्स संघाने ५ पैकी ४ सामने जिंकून गुणतालीकेत अव्वल स्थान गाठले आहे. दरम्यान या सामन्यात ट्रेंट बोल्टने टिपलेला झेल चर्चेचा विषय ठरला. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

trent boult catch
Sachin Tendulkar IPL 2023: मुलाचं पदार्पण होताच क्रिकेटचा देव भावुक! खास पोस्ट शेअर करत दिल्या शुभेच्छा

तर झाले असे की, या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी कारण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी वृद्धिमान साहा आणि शुभमन गिल यांची जोडी मैदानावर आली होती. तर ट्रेंट बोल्ट पहिले षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला आला होता. त्याने या षटकातील तिसरा चेंडू चांगल्या टप्प्यावर टाकला.

फलंदाजी करत असलेल्या वृद्धिमान साहाने या चेंडूवर फ्लिप करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा हा प्रयत्न फसला. (Trent Boult Catch)

trent boult catch
Hrithik Shokeen And Nitish Rana : मुबंईच्या मैदानावर दिल्लीकरांचा तुफान राडा! सामन्यानंतर झाली मोठी कारवाई

भन्नाट वेगाने टाकलेल्या या चेंडूचा वृद्धिमान साहाला अंदाज आला नाही. त्यामुळे चेंडू बॅटची कडा घेत हवेत उडाला. तसा हा झेल इतका कठीण नव्हता. मात्र पुढे जे घडलं ते पाहून तुम्ही हसून हसून लोटपोट व्हाल.

चेंडू बॅटची कडा घेत खूप उंच गेला होता. हा झेल टिपण्यासाठी गोलंदाज ट्रेंट बोल्ट, यष्टीरक्षक संजू सॅमसन, जुरेल आणि शिमरॉन हेटमायर धावले. चौघेही एकमेकांना धडकणार इतक्यात संजू सॅमसनच्या ग्लोजला हा चेंडू लागला आणि त्यानंतर ट्रेंट बोल्टने हा झेल टिपला. या झेलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (Latest sports updates)

राजस्थान रॉयल्स संघाचा जोरदार विजय..

या सामन्यात राजस्थान रॉयल संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेलता होता. तर गुजरात टायटन्स संघाकडून प्रथम फलंदाजी करताना डेव्हिड मिलरने सर्वाधिक ४६ तर शुभमन गिलने ४५ धावांची खेळी केली.

या खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्स संघाने २० षटक अखेर ७ गडी बाद १७७ धावांचा डोंगर उभारला होता. या धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्स संघाकडून कर्णधार संजू सॅमसनने सर्वाधिक ६० धावांची खेळी केली.

तर शिमरॉन हेटमायरने नाबाद ५६ धावांची खेळी करत राजस्थान रॉयल्स संघाला ३ गडी राखुन विजय मिळवून दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com