Sachin Tendulkar IPL 2023: मुलाचं पदार्पण होताच क्रिकेटचा देव भावुक! खास पोस्ट शेअर करत दिल्या शुभेच्छा

Sachin Tendulkar Arjun Tendulkar: अर्जुनचे पदार्पण होताच सचिन तेंडुलकरने पोस्ट करत त्याचे कौतुक केले आहे.
sachin tendulkar tweet
sachin tendulkar tweettwitter

MI VS KKR IPL 2023: रविवारी आयपीएल २०२३ स्पर्धेत डबल हेडर सामन्यांचा थरार पाहायला मिळाला. पहिल्या सामन्यात वानखेडेच्या मैदानावर Mumbai Indians आणि Kolkata Knight Riders हे दोन्ही संघ आमने सामने आले होते.

या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने जोरदार कामगिरी करत विजय मिळवला. मात्र मुख्य आकर्षण अर्जुन तेंडुलकर ठरला. कारण या सामन्यात अर्जुन तेंडुलकरला पदार्पण करण्याची संधी दिली गेली होती. दरम्यान अर्जुनचे पदार्पण होताच सचिन तेंडुलकरने पोस्ट करत त्याचे कौतुक केले आहे.

sachin tendulkar tweet
Sanju Samson Record: IPL स्पर्धेत सिक्सर किंग ठरतोय Sanju Samson; 6 षटकार मारताच झाली मोठ्या विक्रमाची नोंद!

तब्बल २ वर्षे वाट पाहिल्यानंतर Arjun Tendulkar ला पदार्पण करण्याची संधी मिळाली. कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्व झालेला सामना हा त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिलाच सामना ठरला. या सामन्यात त्याने २ षटक गोलंदाजी केली आणि केवळ १७ धावा खर्च केल्या. अर्जुन पदार्पण केव्हा करणार अशी चर्चा सुरू असताना अखेर रविवारी त्याला खेळण्याची संधी मिळाली. (Latest sports updates)

sachin tendulkar tweet
Arjun Tendulkar: अर्जुनचे पदार्पण होताच IPL स्पर्धेत घडला इतिहास! पहिल्यांदाच घडला हा योगायोग

अर्जुनचे पदार्पण होताच अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे. दरम्यान सचिन तेंडुलकरने देखील ट्विट करत त्याचे कौतुक केले आहे. Sachin Tendulkar ने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, ' अर्जुन,आज तू क्रिकेटपटू म्हणून तुझ्या प्रवासात आणखी एक महत्त्वाचं पाऊल टाकलं आहेस. तुझ्या वडिलांचे तुझ्यावर खूप प्रेम आहे, ज्यांना खेळाची आवड आहे, मला माहित आहे की तू खेळाला योग्य तो सन्मान देत राहशील. जर तू असे केलेस तर खेळ नक्कीच तुला ते परत करेल. तु इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे आणि मला खात्री आहे की तु हे करत राहशील. एका सुंदर प्रवासाची ही सुरुवात आहे. हार्दिक शुभेच्छा..'

पदार्पण होताच घडला हा मोठा विक्रम..

अर्जुन तेंडुलकरला २०२१ मध्ये झालेल्या लिलावात मुंबई इंडियन्स संघाने २० लाखांची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले होते. तब्बल २ वर्षे वाट पाहिल्यानंतर अर्जुन तेंडुलकरला आपला पहिला सामना खेळण्याची संधी मिळाली आहे.

दरम्यान या सामन्यात अर्जुन तेंडुलकर पदार्पण करताच एक मोठा विक्रम घडला आहे. सचिन तेंडुलकर आणि अर्जुन तेंडुलकर ही बाप -लेकाची जोडी आयपीएल स्पर्धेत एकाच फ्रॅंचायझीसाठी पदार्पण करणारी पहिलीच जोडी ठरली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com