Sanju Samson
Sanju SamsonSaam Tv

Sanju Samson Record: IPL स्पर्धेत सिक्सर किंग ठरतोय Sanju Samson; 6 षटकार मारताच झाली मोठ्या विक्रमाची नोंद!

IPL Records: संजू सॅमसनच्या नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.

GT VS RR IPL 2023: रविवारी आयपीएल २०२३ स्पर्धेत डबल हेडर सामन्यांचा थरार पाहायला मिळाला. स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते.

या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने जोरदार कामगिरी करत ३ गडी राखून विजय मिळवला आहे. १७८ धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्स संघाकडून कर्णधार संजू सॅमसनने ६० धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने एकूण ६ षटकार मारले. यासह संजू सॅमसनच्या नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.

या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाकडून संजू सॅमसनने महत्वाची खेळी केली. त्याने ३२ चेंडूंचा सामना करत १८७.५० च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना ६० धावा केल्या. यादरम्यान त्याने ३ चौकार आणि ६ गगनचुंबी षटकार मारले.

यासह त्याने आयपीएल स्पर्धेतील एकाच इनिंगमध्ये सर्वाधिक वेळेस ६ किंवा त्यापेक्षा अधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत स्थान मिळवले आहे.

Sanju Samson
Arjun Tendulkar: अर्जुनचे पदार्पण होताच IPL स्पर्धेत घडला इतिहास! पहिल्यांदाच घडला हा योगायोग

संजू सॅमसनने आतापर्यंत ६ वेळेस फलंदाजी करताना ६ किंवा त्यापेक्षा अधिक षटकार मारले आहेत. याबाबतीत त्याने आपल्याच संघातील सलामीवीर फलंदाज जोस बटलरची बरोबरी केली आहे. जोस बटलरने देखील आतापर्यंत एकूण ६ वेळेस ६ षटकार मारले आहेत. तर वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेल या यादीत अव्वल स्थानी आहे. ख्रिस गेलने तब्बल २२ वेळेस हा कारनामा केला आहे. (Latest sports updates)

आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळेस ६ किंवा त्यापेक्षा अधिक षटकार मारणारे फलंदाज

ख्रिस गेल - २२ वेळा.

एबी डिव्हिलियर्स - ११ वेळा.

आंद्रे रसेल - ९ वेळा.

शेन वॉटसन - ७ वेळा.

जोस बटलर - ६ वेळा.

संजू सॅमसन - ६ वेळा.

Sanju Samson
Virat Kohli IPL 2023: हाय व्होल्टेज सामन्यात विराट अन् गांगुलीने वाढवला पारा! सामन्यानंतर नेमकं काय घडलं? - VIDEO

राजस्थान रॉयल्स संघाचा जोरदार विजय..

या सामन्यात राजस्थान रॉयल संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेलता होता. तर गुजरात टायटन्स संघाकडून प्रथम फलंदाजी करताना डेव्हिड मिलरने सर्वाधिक ४६ तर शुभमन गिलने ४५ धावांची खेळी केली.

या खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्स संघाने २० षटक अखेर ७ गडी बाद १७७ धावांचा डोंगर उभारला होता. या धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्स संघाकडून कर्णधार संजू सॅमसनने सर्वाधिक ६० धावांची खेळी केली.

तर शिमरॉन हेटमायरने नाबाद ५६ धावांची खेळी करत राजस्थान रॉयल्स संघाला ३ गडी राखुन विजय मिळवून दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com