CSK head coach : धोनीच्या चेन्नईचा हेड कोच बदलला, महाराष्ट्रातील स्टारकडे जबाबदारी

Zaheer Khan CSK head coach : चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल २०२७ साठी झहीर खान यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. स्टीफन फ्लेमिंगनंतर झहीर खान सीएसकेची जबाबदारी सांभाळणार आहेत.
Zaheer Khan CSK head coach
Zaheer Khan CSK head coachSaam
Published On

Zaheer Khan appointed CSK head coach for IPL 2027 : चेन्नई सुपर किंग्जने (CSK) आयपीएल २०२७ (IPL 2027) च्या हंगामासाठी भारताचा माजी वेगवान गोलंदाज जहीर खान याची मुख्य प्रशिक्षक (Head Coach) म्हणून नियुक्ती केली आहे. दीर्घकाळ मुख्य प्रशिक्षक राहिलेल्या स्टीफन फ्लेमिंग याच्यानंतर आता जहीर खानकडे चेन्नईच्या ताफ्याची कमान आली आहे. आगामी आयपीएल मोसमात संघाचे नेतृत्व आणि रणनीती आखण्यात जहीर खान यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

५ वेळा आयपीएल विजेत्या चेन्नई सुपर किंग्सने (सीएसके) सोमवारी भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली. एक्सवर पोस्ट करत सीएसकेने याबाबत माहिती दिली. Left Arm 'Taking' Over! चेन्नई सुपर किंग्सचे मुख्य प्रशिक्षक म्हणून झहीर खान यांचे स्वागत, अशी पोस्ट CSK ने Xवर केली आहे.

Zaheer Khan CSK head coach
Election Results : काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळला, बहुमत नसतानाही भाजपची सत्ता, क्रॉस व्होटिंगने पलटला सगळा खेळ

२००९ ते २०२६ या काळात स्टीफन फ्लेमिंगने चेन्नई सुपर किंग्सचे मुख्य प्रशिक्षकपद म्हणून काम पाहिले. आता त्याच्यानंतर झहीर खान याच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. सलग तिसऱ्या हंगामात प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवण्यात अपयशी ठरल्यानंतर सीएसकेने फ्लेमिंग याची हकालपट्टी केली.

Zaheer Khan CSK head coach
घराबाहेर पडण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा! २३ जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा, IMD कडून 'यलो अलर्ट

झहीरने भारतासाठी ९२ कसोटी, २०० एकदिवसीय आणि १७ टी-२० सामने खेळले. २०११ च्या एकदिवसीय विश्वचषक विजयात त्याचा सिंहाचा वाटा होता. विश्वचषकात २१ बळी घेत तो भारताचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता. झहीरने १०० आयपीएल सामने खेळले आणि २७.२७ च्या सरासरीने १०२ बळी घेतले. भारतासाठी सर्व फॉरमॅटमध्ये मिळून त्याने एकूण ६१० बळी मिळवले.

Zaheer Khan CSK head coach
Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! सुवर्ण बाजारात आज अचानक भाव कोसळले; पाहा नवीन दर

२०१७ मध्ये झहीरने आयपीएलमधून निवृत्ती घेतली. त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळूर, मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या तीन आयपीएल संघांचे प्रतिनिधित्व केले. निवृत्तीनंतर झहीरने अनेक संघांसोबत काम केले आहे. झहीरला आयपीएल २०२५ साठी लखनौ सुपर जायंट्सचा मेंटॉर म्हणून नियुक्त करण्यात आले होते, परंतु त्याने पुढील हंगामापूर्वीच फ्रँचायझी सोडली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com