मुंबई इंडियन्सला सर्वात मोठा झटका; रोहित शर्मा संघातून बाहेर जाणार?

rohit Sharma : मुंबई इंडियन्सला सर्वात मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. कारण रोहित शर्मा पुढील सामन्यात संघातून बाहेर जाण्याची शक्यता आहे.
Rohit Sharma news
rohit sharmayandex
Published On
Summary

मुंबई इंडियन्सला मोठा धक्का

यंदा मुंबई इंडियन्सची खराब कामगिरी

रोहित शर्मा पुढील सामन्यात संघाबाहेर जाण्याची शक्यता

मुंबई इंडियन्सची आयपीएलमध्ये आतापर्यंतची कामगिरी चांगली राहिली नाही. आयपीएल स्पर्धेतील पॉइंट टेबलमध्ये मुंबई इंडियन्स नवव्या स्थानावर पोहोचली आहे. मुंबई इंडियन्सचा संघ ४ पैकी ३ सामन्यात पराभूत झाला आहे. या खराब कामगिरीमुळे मुंबई इंडियन्सला मोठा झटका बसला आहे. दुसरीकडे संघाचा सलामीवीर रोहित शर्मा देखील पुढील सामन्यापासून बाहेर होण्याची शक्यता आहे. हार्दिक पंड्याचा संघ पुढील सामन्यात पंजाब किंग्सशी भिडणार आहे. पंजाब किंग्सने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही.

Rohit Sharma news
IPL 2026: प्रफुल्ल हिंगे आणि हुसैनच्या भेदक गोलंदाजीसमोर राजस्थानचा सुफडासाफ; हैदराबादचा शानदार विजय

मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स संघाचा सामना गुरुवारी १६ एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियमध्ये खेळवण्यात येईल. रिपोर्टनुसार, रोहित शर्मा पुढील समन्यापासून संघाबाहेर जाण्याची शक्यता आहे. मागील सामन्यात रोहित शर्मा रिटायर्ट हर्ट होऊन तंबूत परतला होता.

रोहित शर्मा १९ धावांवर होता, त्यावेळी हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीने ग्रस्त झाला. त्याच्या दुखापतीविषयी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. रिपोर्टनुसार, रोहित शर्माला पुढील सामन्यात आराम दिला जाण्याची शक्यता आहे.

Rohit Sharma news
Maharashtra Live News Update: अहिल्यानगरमध्ये वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू, पाळीव कुत्राही दगावला

रोहित शर्माला त्याच्या करिअरमध्ये अनेकदा हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली आहे. ही दुखापत बरी होण्यास अनेकदा वेळ लागतो. वृत्तानुसार, रोहित शर्मा हा वानखेडे स्टेडियममध्ये सरावासाठी देखील आला नाही. यामुळे संशय अधिक बळावला आहे. दुखापत लवकर बरी झाली नाही, तर रोहित पुढील सामन्यात खेळताना दिसण्याची शक्यता कमी आहे.

Rohit Sharma news
IPL 2026 Mi vs RR: हार्दिक, रोहितसह सूर्यादादाही फेल; राजस्थान रॉयल्सकडून मुंबईचा दारूण पराभव

३८ वर्षीय रोहित शर्माने आयपीएल स्पर्धेत २०२६ साली केकेआरविरुद्ध ७८ धावांची खेळी खेळली होती. दिल्ली विरोधात ४ धावा केल्या होत्या. तिसऱ्या सामन्यात केवळ ५ धावा करून बाद झाला. चौथ्या सामन्यात १९ धावा रिटायर्ट हर्ट झाला. त्यामुळे तो पुढील सामन्यात खेळणार का, यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com