Bhuvneshwar Kumar: करो-या-मरो सामन्याआधीच अर्शदीप आऊट! भुवनेश्वरला प्लेईंग 11 मध्ये संधी मिळणार का?

India vs West Indies: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी-२० सिरीज २-२ अशी बरोबरीत आहे. निर्णायक पाचव्या सामन्याआधी अर्शदीप सिंहच्या खांद्याला दुखापत झाली. त्याच्या जागी भुवनेश्वर कुमारचा संघात समावेश करण्यात आला असून, अर्शदीपच्या खेळण्याबाबत अंतिम निर्णय अद्याप बाकी आहे.
Bhuvneshwar Kumar
Bhuvneshwar Kumarsaam tv
Published On: 

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या टी-२० सिरीजमधील पाचव्या आणि शेवटच्या सामन्याआधी टीम इंडियामध्ये मोठा बदल करण्यात आलाय. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहला दुखापत झाल्यामुळे त्याच्या जागी अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारचा टीम इंडियाने समावेश करण्यात आला आहे. सिरीजमधील हा निर्णायक सामना १७ ऑक्टोबरला बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी हैदराबादमध्ये झालेल्या चौथ्या टी-२० सामन्यादरम्यान अर्शदीपच्या गोलंदाजी करणाऱ्या खांद्याला दुखापत झाली. त्यामुळे पाचव्या सामन्यात तो खेळणार की नाही, याबाबत अजून निर्णय झालेला नाही. सामन्यापूर्वी त्याच्या प्रकृतीत किती सुधारणा होते, हे पाहून त्याच्या खेळण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

Bhuvneshwar Kumar
ICC Player of the Month: आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कारावर टीम इंडियाची छाप; शुभमन गिल आणि शेफाली वर्माची निवड

भुवनेश्वर कुमारला टीम इंडियामध्ये संधी

अर्शदीपच्या दुखापतीनंतर निवड समितीने भुवनेश्वर कुमारचा टीममध्ये समावेश केलाय. मात्र, भुवनेश्वरला टीममध्ये घेतल्यामुळे अर्शदीप पाचव्या सामन्यात खेळणारच नाही, असं नाही. त्याच्या दुखापतीची स्थिती पाहूनच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

३६ वर्षांच्या भुवनेश्वर कुमारने शेवटचा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना २२ नोव्हेंबर २०२२ रोजी न्यूझीलंडविरुद्ध नेपियरमध्ये खेळला होता. त्यानंतर तो भारतीय टी-२० संघाबाहेर होता. आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या निर्णायक सामन्यासाठी त्याला टीममध्ये स्थान मिळाल्याने त्याच्या कमबॅकची चर्चा सुरू झाली आहे.

Bhuvneshwar Kumar
मोठी बातमी! रोहित शर्मा पुन्हा होणार मुंबईचा कर्णधार, हार्दिक पांड्याचा पत्ता कट होणार?

न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-२० सिरीजसाठीही भुवनेश्वरचा टीममध्ये आधीच समावेश करण्यात आला आहे. आयपीएल २०२६ मध्ये त्याने चांगली कामगिरी केली होती. या सिझनमध्ये त्याने ७.९५ च्या इकॉनॉमी रेटने एकूण २८ विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात त्याला खेळण्याची संधी मिळते का, याकडे सर्वांचे लक्ष लागलंय.

भारत-वेस्ट इंडिज सिरीज २-२ अशी बरोबरीत

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांची टी-२० सिरीज सुरू आहे. या सिरीजमध्ये चार सामने झाल्यानंतर दोन्ही टीम्सने प्रत्येकी दोन सामने जिंकले आहेत. त्यामुळे सिरीज सध्या २-२ अशी बरोबरीत आहे.

शनिवारी १७ ऑक्टोबरला होणारा पाचवा सामना सिरीजता निकाल ठरवणार आहे. हा सामना जिंकून सिरीज आपल्या नावावर करण्यासाठी दोन्ही टीम्स मैदानात उतरतील. त्यामुळे या सामन्यात कोणती टीम जिंकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Bhuvneshwar Kumar
महाराष्ट्राच्या दोन लेकींची मोठी झेप! क्रिकेट संघात मिळाली संधी

टीम इंडियाचा टी-२० संघ

श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, ईशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा (उपकर्णधार), शिवम दुबे, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंह, प्रिन्स यादव, मयंक यादव, नमन धीर आणि भुवनेश्वर कुमार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com