मोठी बातमी! रोहित शर्मा पुन्हा होणार मुंबईचा कर्णधार, हार्दिक पांड्याचा पत्ता कट होणार?

आयपीएल २०२७ पूर्वी मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाबाबत चर्चा सुरू झाली आहे. रोहित शर्मा पुन्हा कर्णधार होणार का? हार्दिक पांड्या केकेआर किंवा अन्य संघात ट्रेड होणार का?अशी चर्चा सुरू झाली.
रोहित शर्मा
Rohit Sharma saam tv
Published On: 

आयपीएलच्या आगामी हंगामापूर्वी मुंबई इंडियंस (MI) फ्रँचायझीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, रोहित शर्माला पुन्हा एकदा कर्णधारपद सोपवण्याचा विचार संघ व्यवस्थापन करत आहेत. हार्दिक पांड्या पुन्हा एकदा मुंबईकडून दुसऱ्या संघात ट्रेड होण्याबाबत चर्चा सुरू आहेत. याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

रोहितचे पुनरागमन का?

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियंसने ५ वेळा (२०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये) आयपीएलचे विजेतेपद पटकावले

होते. २०२४ मध्ये हार्दिक पांड्याकडे कर्णधारपद आल्यानंतर संघाची कामगिरी खालावली होती. त्यामुळे संघात स्थिरता आणण्यासाठी व्यवस्थापन पुन्हा रोहितच्या अनुभवावर विश्वास दाखवण्याच्या विचारात आहे.

रोहित शर्मा
Gold Rate : सोन्याच्या दरात सर्वात मोठी घसरण, १० तोळं सोनं ₹१०,३०० नी स्वस्त, तुमच्या शहरातील ताजे दर जाणून घ्या

हार्दिक पांड्याचं काय होणार?

रोहित पुन्हा कर्णधार झाल्यास हार्दिक पांड्याला दुसऱ्या फ्रँचायझीमध्ये ट्रेड केले जाऊ शकते, अशी चर्चा आहे. तसेच, मुंबई संघ राजस्थान रॉयल्ससोबत यशस्वी जैस्वालला संघात आणण्याबाबत विचार करत असल्याचीही चर्चा रंगली आहे. हार्दिक पांड्या कोलकात्याला जाण्याच्या चर्चेनेही जोर धरला आहे. हार्दिक पांड्या कोलकात्याच्या संघाचा कर्णधार होऊ शकतो. सध्या मुंबई राजस्थान आणि कोलकाता या दोन संघाच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

रोहित शर्मा
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या बड्या आमदाराला जीवे मारण्याची धमकी; पत्र आल्याने राजकीय गोटात खळबजनक

सूर्यकुमार यादव आणि युवा तिलक वर्मा यांच्यासारखे पर्यायही मुंबईकडे उपलब्ध आहेत. पण संघात पुन्हा स्थिरता आणण्यासाठी रोहितच्या अनुभवावर मुंबईचे व्यवस्थापन विचार करत आहे. त्याशिवाय रोहित शर्माचा चाहता वर्गही मोठ्या प्रमाणात आहे. रोहितला कर्मधारपदावरून काढल्यानंतर चाहत्यांकडून मुंबईला ट्रोल करण्यात आले होते. हार्दिक पांड्यालाही रोहितच्या चाहत्यांच्या संतापाचा सामना करावा लागला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com