मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या बड्या आमदाराला जीवे मारण्याची धमकी; पत्र आल्याने राजकीय गोटात खळबजनक

Idris Nayakwadi news today : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार इद्रिस नायकवडी यांना समान नागरी कायद्याला विरोध केल्यामुळे जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र मिळाले आहे. याप्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
NCP MLA Idris Nayakwadi receives a death threat over his opposition to the Uniform Civil Code
NCP MLA Idris Nayakwadi Receives Threatening Letter Over Uniform Civil Codeसाम टीव्ही मराठी
Published On: 

विजय पाटील, सांगली प्रतिनिधी

Idris Nayakwadi Death Threat : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) आमदार इद्रिस नायकवडी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अज्ञातांनी पत्र पाठवून ही धमकी दिली असून, "समान नागरी कायद्याला (Uniform Civil Code Maharashtra update) विरोध केलात तर तुम्हाला खलास करू," असे त्यात म्हटले आहे. पत्रामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

(NCP MLA Maharashtra news)

राज्यामध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास आमदार नायकवडी यांचा विरोध आहे. एवढेच नव्हे तर, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare UCC statement) यांना पत्र लिहून त्यांनी या कायद्याबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहनही केले होते. यावरूनच, समान नागरी कायद्यास विरोध केल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. (Idris Nayakwadi death threat)

NCP MLA Idris Nayakwadi receives a death threat over his opposition to the Uniform Civil Code
राजकारणात खळबळ! विरोधी पक्षाला खिंडार, ३ आमदार आज भाजपात प्रवेश करणार

याप्रकरणी आमदार नायकवडी यांनी मिरज शहर पोलीस (Miraj police latest news) ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, आमदार नायकवडी यांना मिळालेल्या या धमकीमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. पत्र कुणी पाठवले? याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

NCP MLA Idris Nayakwadi receives a death threat over his opposition to the Uniform Civil Code
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com