Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Augest installment ladki bahin yojana: लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे पैसे या आठवड्यात जमा होणार आहेत. संभाव्य तारीख देखील समोर आली आहे.
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500
Augest installment ladki bahin yojanameta ai
Published On
  • लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट

  • ऑगस्टचा १५०० रुपयांचा हप्ता या आठवड्यात येणार

  • २४ सप्टेंबरनंतर लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार

  • १ कोटी ६६ लाख लाडक्या बहिणींना १५०० रुपये मिळणार

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. या आठवड्यात लाडक्या बहिणींच्या खात्यावर ऑगस्ट महिन्याचे १५०० रुपये जमा होण्याची शक्यता आहे. जुलै महिन्याचे पैसे मिळाल्यानंतर ऑगस्ट महिन्याचे पैसे कधी मिळणार याची लाडक्या बहिणी आतुरतेने वाट पाहत आहेत. सरकार नेहमी सणासुदीच्या काळात लाडकींच्या खात्यात पैसे जमा करते. त्याचप्रमाणे गणेशोत्सवात ते लाडकींच्या खात्यात १५०० रुपये जमा करणार असल्याची चर्चा सुरू आहे. अशात या आठवड्यात लाडकींना ऑगस्टच्या हप्त्याचे पैसे मिळतील असे सांगितले जात आहे. पण त्याबाबत अधिकृत माहिती समोर आली नाही.

ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे पैसे कधी येणार याची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. गणेशोत्सवाच्या काळामध्ये लाडक्या बहिणींना सरकार गिफ्ट देण्याच्या तयारीत आहेत. १ कोटी ६६ लाख पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे १५०० रुपये सरकार जमा करणार आहे त्यासाठी प्रशासकीय स्तरावर हालचालींना वेग आला आहे. मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिनयाचा हप्ता वितरीत करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. २४ सप्टेंबरनंतर लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने पैसे जमा करण्यास सुरूवात केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500
Ladki Bahin Yojana: खुशखबर! लाडक्या बहिणींच्या खात्यात 'या' तारखेला येणार ₹१,५००; ऑगस्ट हप्त्याची नवीन अपडेट समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com