gold rate before Diwali : सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. पितृपक्ष संपताच सोन्याच्या खरेदीत वाढ झाली आहे, पण दर मात्र घसरत असल्याने खरेदीदारात आनंदाचे वातावरण आहे. दसरा-दिवाळीच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण सुरू झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात प्रति तोळा १०३० रूपयांनी घसरण नोंदवण्यात आली.
जागतिक बाजारातील घडामोडी आणि स्थानिक मागणीतील बदलांमुळे आज भारतीय बाजारात २४ कॅरेट, २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या दरात घसरण नोंदवली गेली आहे. २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,३५,९०० रुपये झाला असून यात प्रति १० ग्रॅम ९५० रुपयांची घसरण झाली आहे. सणासुदीच्या काळात सोने खरेदी वाढण्याची शक्यता असतानाच, दसऱ्याच्या आधीच सोन्याचे दर घसरल्यामुळे सराफा बाजारात ग्राहकांची पावले वळू लागली आहेत. सोन्यासोबत चांदीच्या दरात कोणताही बदल नोंदवण्यात आला नाही. १८ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,११,१९० रुपये झाला असून यात प्रति १० ग्रॅम ७८० रुपयांची घसरण पाहायला मिळाली आहे.
आजचे सोन्याचे दर
१ ग्रॅम: ₹१४,८२६ (₹१०३ ने कमी)
१० ग्रॅम: ₹१,४८,२६० (₹१,०३० ने कमी)
१०० ग्रॅम: ₹१४,८२,६०० (₹१०,३०० ने कमी)
१ ग्रॅम: ₹१३,५९० (₹९५ ने कमी)
१० ग्रॅम: ₹१,३५,९०० (₹९५० ने कमी)
१०० ग्रॅम: ₹१३,५९,००० (₹९,५०० ने कमी)
१ ग्रॅम: ₹११,११९ (₹७८ ने कमी)
१० ग्रॅम: ₹१,११,१९० (₹७८० ने कमी)
१०० ग्रॅम: ₹११,११,९०० (₹७,८०० ने कमी)
पितृपक्ष संपल्यानंतर शुभ कार्ये आणि सणांची सुरुवात होते. त्यातच दसऱ्याचा मुहूर्त हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जात असल्याने या दिवशी सोने खरेदीला मोठे धार्मिक महत्त्व आहे. दसऱ्याच्या आधीच सोन्याचे भाव उतरल्यामुळे खरेदीदारांसाठी ही उत्तम संधी मानली जात आहे. सराफा व्यावसायिकांच्या मते, आगामी काळात बाजारातील मागणीनुसार दरात पुन्हा बदल होऊ शकतात, त्यामुळे सध्याची घसरण ग्राहकांसाठी फायदेशीर ठरू शकते.
मुंबई
२४ कॅरेट (24K): ₹१४,८२६ प्रति ग्रॅम
२२ कॅरेट (22K): ₹१३,५९० प्रति ग्रॅम
१८ कॅरेट (18K): ₹११,११९ प्रति ग्रॅम
पुणे (Pune
२४ कॅरेट (24K): ₹१४,८२६ प्रति ग्रॅम
२२ कॅरेट (22K): ₹१३,५९० प्रति ग्रॅम
१८ कॅरेट (18K): ₹११,११९ प्रति ग्रॅम
नागपूर (Nagpur)
२४ कॅरेट (24K): ₹१४,८२६ प्रति ग्रॅम
२२ कॅरेट (22K): ₹१३,५९० प्रति ग्रॅम
१८ कॅरेट (18K): ₹११,११९ प्रति ग्रॅम
नाशिक (Nashik)
२४ कॅरेट (24K): ₹१४,८२९ प्रति ग्रॅम
२२ कॅरेट (22K): ₹१३,५९३ प्रति ग्रॅम
१८ कॅरेट (18K): ₹११,१२२ प्रति ग्रॅम
वसई-विरार (Vasai-Virar)
२४ कॅरेट (24K): ₹१४,८२९ प्रति ग्रॅम
२२ कॅरेट (22K): ₹१३,५९३ प्रति ग्रॅम
१८ कॅरेट (18K): ₹११,१२२ प्रति ग्रॅम
संभाजीनगर
२४ कॅरेट (24K): ₹१४,८२६ प्रति ग्रॅम
२२ कॅरेट (22K): ₹१३,५९० प्रति ग्रॅम
१८ कॅरेट (18K): ₹११,११९ प्रति ग्रॅम
सोलापूर (Solapur)
२४ कॅरेट (24K): ₹१४,८२६ प्रति ग्रॅम
२२ कॅरेट (22K): ₹१३,५९० प्रति ग्रॅम
१८ कॅरेट (18K): ₹११,११९ प्रति ग्रॅम
भिवंडी (Bhiwandi)
२४ कॅरेट (24K): ₹१४,८२९ प्रति ग्रॅम
२२ कॅरेट (22K): ₹१३,५९३ प्रति ग्रॅम
१८ कॅरेट (18K): ₹११,१२२ प्रति ग्रॅम
कोल्हापूर (Kolhapur)
२४ कॅरेट (24K): ₹१४,८२६ प्रति ग्रॅम
२२ कॅरेट (22K): ₹१३,५९० प्रति ग्रॅम
१८ कॅरेट (18K): ₹११,११९ प्रति ग्रॅम
लातूर (Latur)
२४ कॅरेट (24K): ₹१४,८२९ प्रति ग्रॅम
२२ कॅरेट (22K): ₹१३,५९३ प्रति ग्रॅम
१८ कॅरेट (18K): ₹११,१२२ प्रति ग्रॅम
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.