Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! सप्टेंबरचा ₹१५०० चा हप्ता कधी येणार? आज होणार निर्णय, महत्त्वाची अपडेट

Ladki Bahin Yojana Next Installment date : लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबर महिन्याच्या १५०० रुपयांच्या हप्त्याची प्रतीक्षा कायम आहे. ऑक्टोबरमध्ये एक हप्ता मिळणार की सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे ३००० रुपये दिवाळीपूर्वी खात्यात जमा होणार?
Ladki Bahin Yojana July installment payment update
Women await the July ₹1,500 Ladki Bahin Scheme installment in Maharashtra.meata ai
Published On: 

Ladki Bahin Yojana September ₹1,500 Installment : ऑक्टोबर महिना अर्धा झाला, नवरात्री सुरू झाली पण अद्याप लाडक्या बहि‍णींच्या सप्टेंबरच्या हप्त्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस लाडक्या बहि‍णींना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी देण्यात आला होता. पण आता सप्टेंबरचा निधी कधी दिला जाणार? अशी चर्चा महिलांमध्ये सुरू झाली आहे. याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाडक्या बहि‍णींच्या निधीवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सप्टेंबर महिन्याचा १५०० रुपयांचा थकीत हप्ता चालू ऑक्टोबर महिन्यात कधी मिळणार आणि तो कसा वितरित केला जाणार, याकडे राज्यातील कोट्यवधी लाभार्थी महिलांचे लक्ष लागले आहे. आज पार पडणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत अत्यंत महत्त्वाचा निर्णय होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. फक्त सप्टेंबर महिन्याचा हप्ता द्यायचा की सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्याचे हप्ते दिवाळी एकत्र द्यायचे? याबाबत लवकरच निर्णय होऊ शकतो.

Ladki Bahin Yojana July installment payment update
नायट्रोजन बॉम्बसारखी पसरली आग! मुंबईत १४ मजली इमारतीचा थरार; २ महिलांचा होरपळून मृत्यू, ४० जणांना वाचवले

फक्त एकाच महिन्याचा म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा होणार असले तर तो दसऱ्यानंतर येण्याची शक्यता आहे. तर ऑक्टोबर आणि सप्टेंबर या दोन महिन्याचे ३ हजार रूपये दिवाळीत येणार असल्याची चर्चाही जोरदार सुरू आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे हप्ते पात्र महिलांच्या बँक खात्यात थेट डीबीटी (DBT) द्वारे वर्ग करण्यात आले आहेत. राज्यात दुष्काळाची परिस्थिती आहे, त्यामुळेही हप्त्याला विलंब होत असल्याचे बोलले जात आहे.

Ladki Bahin Yojana July installment payment update
Boat Accident: सरकारी नाव उलटून १३ चिमुकल्यांचा करुण अंत, पीएम मोदींकडून दुःख व्यक्त; ६ लाखांच्या मदतीची घोषणा

दोन हप्ते एकत्र मिळणार?

दिवाळीच्या तोंडावर महिलांच्या हाताला आर्थिक हातभार लावण्यासाठी राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे समजतेय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर महिन्याचा थकीत हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा नियमित हप्ता, असे एकूण ३००० रुपये एकत्र महिलांच्या खात्यात जमा करण्याबाबत प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू आहेत. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत या आर्थिक तरतुदीला आणि निधी वितरणाला मंजुरी मिळण्याची दाट शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com