Boat Accident: सरकारी नाव उलटून १३ चिमुकल्यांचा करुण अंत, पीएम मोदींकडून दुःख व्यक्त; ६ लाखांच्या मदतीची घोषणा

Boat Accident Death Toll: बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील राघोपुर येथे गंगा नदीत नाव उलटून १३ मुलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाख रुपये, तर बिहार सरकारने ४ लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली.
Bihar boat accident latest news
Bihar boat accident latest newsSaam TV
Published On: 

Bihar boat accident latest news : बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील राघोपुरात १३ मुलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. गंगा नदीत नाव उलटल्याने झालेल्या अपघातात १३ निष्पाप मुलांचा (Ganga river boat accident 13 children dead) बुडून मृत्यू झाला आहे. तर काहीजण बेपत्ता असल्याची माहिती आहे. मंगळवारी रात्री ही दुर्घटना घडली. आज सकाळी पुन्हा एकदा एनडीआरएफकडून (PMNRF compensation for accident victims) शोधकार्याला सुरूवात करण्यात आली आहे. नाव उलटल्याच्या या घटनेमुळे संपूर्ण बिहारमध्ये आणि मृतांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रामपुर श्यामचंद पंचायत येथील भगतान टोला परिसरात श्राद्धाचा कार्यक्रम होता. यामध्ये सहभागी होण्यासाठी जवळपास २० ते २५ लोक एका छोट्या नावेवर बसून ढाबच्या पलीकडे जात होते. ही सर्व मुले आणि ग्रामस्थ एकाच गावातील होते. नदीच्या प्रवाहात जात असताना ही भरलेली नाव अचानक उलटली आणि सर्वजण पाण्यात बुडाले. ही नाव सरकारी असल्याची माहिती समोर आली आहे.

Bihar boat accident latest news
Old Monk बंदीमुळे महाराष्ट्राला ३५० कोटींचा फटका; RUM च्या विक्रिला FSSAI कडून परवानगी पण टाकली मोठी अट

नाव बुडाल्याची माहिती मिळताच आजूबाजूच्या गावकऱ्यांनी आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तासाभराच्या अथक परिश्रमांनंतर काही लोकांना पाण्यातून बाहेर काढण्यात आले. ग्रामस्थांनी तातडीने १७ मुलांना राघोपुर फतेहपुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात (PHC) उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर १३ मुलांना मृत घोषित केले. या दुर्घटनेत ३ मुलांना गंभीर स्थितीत पीएमसीएच (PMCH) रेफर करण्यात आले आहे. तर एकाची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात आले.

मृत मुलांची नावे:

या अपघातात जीव गमावलेल्या मुलांमध्ये बहुतांश १५ वर्षांआसपासच्या वयाचे आहेत. मृतांमध्ये मीरा कुमारी, निशु कुमारी, अनिषा कुमारी, सुनीता कुमारी, आर्यन कुमार, मोहन कुमार, अमृता कुमारी, अंकिता कुमारी, पिंकी कुमारी, नमन कुमार, सिकी कुमारी, भोनू कुमारी आणि सोनम कुमारी यांचा समावेश आहे.

मृतांच्या कुटुंबियांना मदतीची घोषणा

दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून (PMNRF) प्रत्येकी २ लाख रुपये आणि जखमींना ५०,५०० रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच बिहार सरकारकडूनही मृतांच्या वारसांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची अनुग्रह मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

Bihar boat accident latest news
ट्रॅफिकची झंझट कायमची मिटणार! मरीन ड्राईव्ह ते ऑरेंज गेट फक्त ५ मिनिटांत; मुंबईकरांसाठी मोठी बातमी

स्थानिकांचे गंभीर आरोप

या घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी जिल्हा प्रशासन आणि अधिकाऱ्यांवविरोधात रोष व्यक्त केला. ग्रामस्थांचा असा दावा आहे की, ज्या नाववरून हे लोक प्रवास करत होते ती सरकारी नाव होती. ही नाव अतिशय जीर्ण स्थितीत होती. रात्रीच्या वेळी सुरक्षिततेचा कोणताही उपाय नसताना आणि प्रशासनाने रात्रीच्या वेळी नाव चालवण्यास बंदी घातलेली असतानाही हा प्रवास सुरू होता. या मुद्यावरून ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

घटनेची माहिती मिळताच वैशालीच्या जिल्हाधिकारी (DM) वर्षा सिंह आणि एसएसपी शुभांक मिश्रा पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी फौजफाट्यासह घटनास्थळी व आरोग्य केंद्रात पोहोचले. परिस्थितीचे गांभीर्य पाहता एसडीआरएफ (SDRF) आणि स्थानिक गोताखोरांच्या मदतीने बचाव व शोध मोहीम राबवण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com