ट्रॅफिकची झंझट कायमची मिटणार! मरीन ड्राईव्ह ते ऑरेंज गेट फक्त ५ मिनिटांत; मुंबईकरांसाठी मोठी बातमी

Orange Gate Marine Drive Tunnel : मुंबईतील ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भूमिगत बोगदा प्रकल्पाचे १ किलोमीटर खोदकाम पूर्ण झाले आहे. ८,०५६ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पामुळे सध्याचा २२ ते ४० मिनिटांचा प्रवास ५ ते ७ मिनिटांवर आणण्याचे एमएमआरडीएचे उद्दिष्ट आहे.
Orange Gate-Marine Drive Underground Tunnel Completes
Orange Gate-Marine Drive Underground Tunnel Completes
Published On: 

Mumbai Tunnel Project : मुंबईकरांचा दैनंदिन प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी आणि शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आखण्यात आलेल्या ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह या भूमिगत बोगदा प्रकल्पाचे काम आता वेगाने पुढे सरकत आहे. ८ हजार ५६ कोटी रुपये खर्चाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील १ किलोमीटरच्या बोगद्याचे खोदकाम पूर्ण झाले आहे. TOI ने याबाबतचे वृत्त दिले आहे. (Mumbai Traffic Update: Orange Gate-Marine Drive Underground Tunnel Completes 1 km of Excavation, Targets June 2028 Completion)

सध्या रस्त्यावरून प्रवास करताना लागणारा २२ ते ४० मिनिटांचा वेळ थेट ५ ते ७ मिनिटांवर आणण्याचे MMRDA चे उद्दिष्ट आहे. ईस्टर्न फ्रीवेला थेट कोस्टल रोड आणि मरीन ड्राईव्हशी जोडणाऱ्या या सुमारे १० किलोमीटरच्या मार्गामुळे दक्षिण मुंबईतील प्रवास अत्यंत वेगवान आणि आरामदायी होणार आहे.

Orange Gate-Marine Drive Underground Tunnel Completes
Old Monk बंदीमुळे महाराष्ट्राला ३५० कोटींचा फटका; RUM च्या विक्रिला FSSAI कडून परवानगी पण टाकली मोठी अट

बोगद्याची वैशिष्ट्ये

या प्रकल्पात जमिनीखाली ७ किलोमीटर लांबीचे दोन स्वतंत्र जुळे बोगदे उभारले जात आहेत.

दोन्ही बोगद्यांमध्ये ३.२ मीटर रुंदीच्या २-२ वाहतूक लेन्स (Traffic Lanes) आणि एका आपत्कालीन लेनची (Emergency Lane) व्यवस्था असेल.

तातडीच्या प्रसंगी वापरासाठी दोन्ही बोगद्यांच्या दरम्यान दर ३०० मीटरवर जोडणारे मार्ग (Cross Passages) तयार केले जाणार आहेत.

हा बोगदा मेट्रो लाईन ३ आणि रेल्वे लाईनच्या खालून जाणार असून, त्याची खोली जमिनीखाली १२ ते ५२ मीटर दरम्यान असेल.

हा मार्ग जमिनीखालून जात असताना वर सुमारे ७०० निवासी इमारती आणि ऐतिहासिक (हेरिटेज) परिसर आहेत.

Orange Gate-Marine Drive Underground Tunnel Completes
Fact Check : एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंची बदली? स्वतःच समोर येऊन सांगितलं सत्य

प्रकल्प कधी पूर्ण होणार?

सध्याच्या रस्त्यांवरून प्रवास करताना २२ ते ४० मिनिटांचा वेळ लागतो. मात्र, हा बोगदा पूर्ण झाल्यावर हाच प्रवास अवघ्या ५ ते ७ मिनिटांत पार करता येईल. या प्रकल्पाची अधिकृत मुदत डिसेंबर २०२८ पर्यंत आहे. मात्र, नागरिकांच्या सोयीसाठी हा प्रकल्प जून २०२८ पर्यंतच पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

किती खर्च झाला:

एकूण प्रकल्प खर्च: ₹८,०५६ कोटी

मार्गाची एकूण लांबी: १० किमी (७ किमी भूमिगत बोगदा)

सध्या पूर्ण झालेले काम: १ किमी टनेलिंग (५२६ लायनिंग रिंग्स बसवून पूर्ण)

मुख्य मार्ग: पी डिमेलो रोडवरील ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह (कोस्टल रोडजवळ)

अमलबजावणी यंत्रणा: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA)

कंत्राटदार: लार्सन अँड टुब्रो (L&T)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com