

Ladki Bahin Yojana latest news today : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा मिळणारे १५०० रुपये अद्याप खात्यात (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Maharashtra) जमा झालेले नाहीत. सप्टेंबर महिना संपून ऑक्टोबरची १२ तारीख उजाडली आहे. पण अद्याप हप्त्याबाबत कोणतीही अपडेट आलेली नाही. ऑक्टोबर महिनाही आता अर्धा संपत आल्याने महिलांमध्ये उत्सुकता आणि चिंतेचे वातावरण आहे. (Ladki Bahin September instalment date)
सूत्रांच्या माहितीनुसार, सप्टेंबरचा हप्ता दसऱ्यानंतर जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, जर सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा निधी उशीरा झाला, तर आगामी नोव्हेंबर महिन्यातील दिवाळी सण डोळ्यासमोर ठेवून सरकार दोन्ही महिन्यांचे मिळून एकत्रित ३,००० रुपये खात्यात जमा करू शकते, अशी चर्चा राज्यातील महिलांमध्ये रंगली आहे.
२,१०० रुपयांच्या दाव्यांचे सरकारकडून खंडन Ladki Bahin ₹2100 government GR
आता महिलांना १५०० रुपयांऐवजी थेट २,१०० रुपयांचा हप्ता मिळणार आहेत. याबाबतचा नवीन शासन निर्णयही (GR) निघाल्याचा दावाही करण्यात येत होता. हा मेसेज सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत होता. पण या सर्व चर्चांवर आणि व्हायरल मेसेजवर आता सरकारकडून आणि प्रशासकीय स्तरावरून महत्त्वाचा खुलासा करण्यात आला आहे. हा मेसेज फेक असल्याचे सांगितलेय. सरकारने हे दावे फेटाळून लावले असून ही अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे. सध्यातरी पूर्वीप्रमाणेच १,५०० रुपयांची रक्कम मिळणार आहे.
ई-केवायसी (e-KYC) आणि कागदपत्रे अपूर्ण असल्यास लाभ थांबणार:
ज्या महिलांची ई-केवायसी (e-KYC) किंवा आधार-बँक सीडिंग (DBT Active) पूर्ण नाही, त्यांचे हप्ते तांत्रिक कारणांमुळे रोखले जाऊ शकतात. त्यामुळे शासनाकडून वारंवार कागदपत्रे अद्ययावत करण्याचे आवाहन केले जात आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याबाबतचा निर्णय सरकारकडून लवकरच घेतला जाण्याची शक्यता आहे. १३ तारखेला राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक होणार आहे. या बैठकीत लाडक्या बहिणींना हप्ता देण्यासंदर्भात निर्णय होऊ शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.