नायट्रोजन बॉम्बसारखी पसरली आग! मुंबईत १४ मजली इमारतीचा थरार; २ महिलांचा होरपळून मृत्यू, ४० जणांना वाचवले

Nalasopara High-Rise Fire Death Toll : नालासोपाऱ्यातील अचोळे परिसरातील इंपिरियल हाईट्स या १४ मजली इमारतीला मंगळवारी रात्री भीषण आग लागली. या दुर्घटनेत फाल्गुनी शाह आणि अश्विनी पारकर या दोन महिलांचा मृत्यू झाला
Nalasopara High-Rise Fire Death Toll
Nalasopara High-Rise Fire Death Toll Saam TV
Published On: 

Nalasopara Imperial Heights fire latest news : नालासोपाऱ्याच्या गजबजलेल्या अचोळे परिसरातील वसई-लिंक रोडवर असलेल्या ‘इंपिरियल हाईट्स’ या १४ मजली इमारतीत मंगळवारी रात्री उशिरा भीषण आग लागली. या दुर्घटनेत २ महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आगीच्या प्रचंड ज्वालांमुळे तब्बल चार मजले जळून खाक झाले. या थरारक घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र भीतीचे वातावरण पसरले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री ११ ते साडेअकराच्या सुमारास इमारतीच्या दहाव्या मजल्यावर अचानक शॉर्ट सर्किट झाले आणि पाहता पाहता आगीने उग्र रूप धारण केले. आगीचा फैलाव इतक्या वेगाने झाला की, दहाव्या मजल्यासह जवळपासचे चार मजले पूर्णपणे आगीच्या विळख्यात आले. इंपिरियल हाईट्समध्ये रात्री लागलेल्या आगीमध्ये फाल्गुनी शाह, अश्विनी पारकर या महिलांचा मृत्यू झाला. तर काहीजणांना गंभीर दुखापत झाली आहे. अग्निशमन दलाने ४ जणांना सुखरूप वाचवले.

Nalasopara High-Rise Fire Death Toll
Boat Accident: सरकारी नाव उलटून १३ चिमुकल्यांचा करुण अंत, पीएम मोदींकडून दुःख व्यक्त; ६ लाखांच्या मदतीची घोषणा

मध्यरात्री अचानक घडलेल्या या प्रकारामुळे इमारतीत गाफील असलेल्या रहिवाशांमध्ये एकच पळापळ व आरडाओरडा सुरू झाला. जीव वाचवण्यासाठी अनेक नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली, तर काहींनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी इमारतीच्या गॅलरीतून एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्याचा प्रयत्न केला.

Nalasopara High-Rise Fire Death Toll
ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३,००० रुपये जमा होणार? मोठी अपडेट समोर; २,१00 रुपयांवर सरकारचे स्पष्टीकरण

या भीषण दुर्घटनेत २ महिलांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी माहिती पालिकेच्या आयुक्तांनी दिली आहे. आग एवढी भयानक होती की घरातील सामान जळून खाक झाले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वसई-विरार आणि मीरा-भायंदर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत तब्बल सहा तासांनंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. या वेळी इमारतीत अडकलेल्या ३० ते ४० रहिवाशांना सुखरूप रेस्क्यू करून बाजूच्या एका हॉलमध्ये स्थलांतरित करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com