WTC FINAL : WTC फायनलसाठी लवकरच होणार टीम इंडियाची घोषणा! KL Rahul सह या १५ खेळाडूंना मिळू शकते संधी

indian team wtc final sqaud: ओव्हलच्या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये अंतिम सामना रंगणार आहे.
IND vs ENG: चौथ्या सामन्यात दिग्गजासह 'या' 2 खेळाडूंना डच्चू मिळणार?
IND vs ENG: चौथ्या सामन्यात दिग्गजासह 'या' 2 खेळाडूंना डच्चू मिळणार?Saam Tv
Published On: 

team india for wtc final: भारतीय संघाने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. ७ ते ११ जून दरम्यान ओव्हलच्या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये अंतिम सामना रंगणार आहे.

त्यामुळे ७ मे पर्यंत भारतीय संघाला १६ सदस्यीय संघाची घोषणा करावी लागणार आहे. या संघात कुठल्या खेळाडूंना संधी मिळू शकते, चला पाहूया.

IND vs ENG: चौथ्या सामन्यात दिग्गजासह 'या' 2 खेळाडूंना डच्चू मिळणार?
IND vs AUS : कसोटीपाठोपाठ वनडेतूनही KL Rahul चा पत्ता कट? हार्दिक पांड्या हुकुमी एक्क्याला देणार संधी!

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ७ मे पर्यंत १६ खेळाडूंची निवड करावी लागणार आहे. तर २२ मे पर्यंत संघात बदल करण्याची मुदत मिळणार आहे.

भारतीय संघातील मध्यक्रमातील फलंदाज श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाला आहे. तो जर फिट झाला नाहीतर केएल राहुलला संघात स्थान मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. (Latest sports updates)

बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पहिल्या २ सामन्यांमध्ये फ्लॉप ठल्यानंतर केएल राहुलला संघाबाहेर केलं गेलं होतं. त्यानंतर शुभमन गिलला सलामीवीर फलंदाज म्हणून संधी दिली गेली होती.

आता जर केएल राहुलला संधी मिळाली तर तो पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो.

IND vs ENG: चौथ्या सामन्यात दिग्गजासह 'या' 2 खेळाडूंना डच्चू मिळणार?
Ind vs Aus: पहिल्या वनडेत हार्दिक पंड्या 'या' प्लेइंग 11 सह उतरणार मैदानात! विराटच्या खास प्लेअरला ठेवणार संघाबाहेर

केएल राहुलचा परदेशातील रेकॉर्ड दमदार आहे. त्यामुळे त्याला यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संधी दिली जाऊ शकते. कारण ऑस्ट्रेलियाविरुध्द झालेल्या कसोटी मालिकेत केएस भरतला देखील हवी तशी कामगिरी करता आली नव्हती.

त्यामुळे या महत्वाच्या सामन्यात केएस भरतच्या जागी केएल राहुल यष्टिरक्षण करताना दिसून येऊ शकतो.

असा असू शकतो १६ सदस्यीय संघ.

रोहित शर्मा (कर्णधार ), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (फिट असेल तर ), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, केएस भरत, आर अश्विन, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, जयदेव उनाडकट, उमेश यादव.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com