Video: कधी डोळे दाखवून घाबरवायचा, आता त्याच्यासमोर डोकं टेकवले; कोहलीचा व्हिडिओ होतोय व्हायरल

गेल्या काही दिवसापासून विराट कोहली खराब खेळीमुळे चर्चेत आहे.
Virat Kohli
Virat KohliSaam Tv
Published On

नवी दिल्ली : दिवस प्रत्येकवेळी बदलत असतात. प्रत्येकाचे दिवस सारखे राहत नसतात, ते कधीही बदलत असतात. ते कधीही सारखे राहत नाही. प्रत्येकाचा दिवस हा येत असतो. कोण उंच शिखरावरुन खाली येतो, तर कोण शेवटच्या नंबरचा चमकदारपणे चमकतो. आता असंच भारतीय क्रिकेट टीममध्ये (Team India) झाल्याचे पाहायला मिळत आहे.

सध्या टीम इंडियामध्ये (Team India) एकच तारा सतत चमकत आहे आणि सर्वात जास्त तो म्हणजे सूर्यकुमार यादव. एके काळी सर्वात ताकदवान चेहरा बनलेला विराट कोहली सध्या खराब फॉर्ममुळे बॅकफुटवर आला आहे. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी कोहलीने ज्या खेळाडूला रागाने डोळे दाखवले होते, त्याच खेळाडू समोर विराट झुकला असल्याचे कालच्या सामन्यात पाहायला मिळाले, याटा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Virat Kohli
Asia Cup IND vs HK : भारताचा हाँगकाँगवर दणदणीत विजय; संघ सुपर ४ मध्ये दाखल

सध्या आशिया कप सुरू आहे. भारतीय टीम चा पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध झाला. काल बुधवार 31 ऑगस्ट 2022 रोजी भारत आणि हाँगकाँगमध्ये सामना झाला, यामध्ये भारताने 40 धावांनी विजय मिळवला. भारतासाठी या सामन्यात विराट कोहलीने बऱ्याच कालावधीनंतर अर्धशतक झळकावले.

मात्र सूर्यकुमार यादवनेही चांगली खेळी केली. चौथ्या क्रमांकावर आलेल्या सूर्याने केवळ धावांचा पाऊसच पाडला नाही, तर संथ फलंदाजीचा फटका बसलेल्या भारतीय डावाला गती देताना १९२ धावांपर्यंत मजल मारली, यामुळे टीम इंडियाचा विजय निश्चित झाला.

Virat Kohli
IND vs HK : भारत विरुद्ध हॉंगकॉंग मॅच किती वाजता सुरू होईल?, कुठे पाहता येईल सामना?

विराट कोहलीने सूर्याकुमारच्या खेळीला ठोकला सलाम

सूर्यकुमार यादवने या डावात फक्त 22 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले, जे त्याचे आंतरराष्ट्रीय टी-20 मधील सर्वात जलद अर्धशतक आहे. सूर्याने शेवटच्या 4 षटकारांच्या मदतीने 26 चेंडूंत नाबाद 68 धावा केल्या. यात 6 चौकार, 6 षटकार ठोकले. टीम इंडियाच्या खेळानंतर पॅव्हेलियनमध्ये परत जात असताना, विराट कोहली (Virat Kohli) जागी थांबला आणि सूर्याची वाट पाहू लागला आणि सूर्या समोर येताच कोहलीने मान खाली करत सुर्याला या शानदार खेळीबद्दल आदर दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com