IND vs HK : भारत विरुद्ध हॉंगकॉंग मॅच किती वाजता सुरू होईल?, कुठे पाहता येईल सामना?

विराटचा फॉर्म ही हॉंगकॉंगच्या गोलंदाजांसाठी धोक्याची घंटा आहे.
IND vs HK, Asia cup Match
IND vs HK, Asia cup MatchSaam TV
Published On

IND vs HK, Asia cup Match : आशिया कप 2022 (Asia Cup 2022) स्पर्धेत आज टीम इंडियाचा सामना हॉंगकॉंग संघासोबत होणार आहे. स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात भारताने पाकिस्तानला पछाडत धमाकेदार सुरूवात केली. आजचा सामना जिंकून रोहित अँड कंपनी आता पुढील फेरीत जाण्याचा प्रयत्न करेल. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय गोलंदाजीत धार दिसली. याशिवाय विराट कोहली सुद्धा जोरदार फॉर्ममध्ये दिसत होता. विराटचा फॉर्म ही हॉंगकॉंगच्या गोलंदाजांसाठी धोक्याची घंटा आहे. (IND vs HK, Asia cup Match Live Updates)

IND vs HK, Asia cup Match
Asia Cup 2022 : बांग्लादेश-अफगाणिस्तान सामन्यात अनेक रेकॉर्डची नोंद; नजीबुल्लाने सर्वांनाच टाकलं मागे

भारतीय गोलंदाजांना लय सापडली

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यांत भारताचा (Team India) अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने उत्कृष्ट गोलंदाजी करत 4 बळी घेतले. याशिवाय हार्दिक पांड्याने 3 बळी घेतले नाबाद 33 धावा करत अष्टपैलू कामगिरी केली. भुवनेश्वर आणि हार्दिक या दोघांनीही आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवावा अशी आशा भारतीय संघाला असेल.

केएल राहुलच्या फॉर्मची चिंता

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यांत भारताचा सलामीवीर फलंदाज केएल राहुल हा दबावात दिसला. राहुल पहिल्याच चेंडूवर माघारी परतला. गेल्या काही दिवसांपासून राहुलने एकही टी-20 सामना खेळलेला नाही. याशिवाय तो दुखापतग्रस्त देखील होता. त्यामुळे राहुलला लवकरात लवकर फॉर्म गवसावा अशी अपक्षा भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना आहे. राहुलसोबतच रोहित शर्माही हाँगकाँगविरुद्ध काही धावा करून फॉर्म परत मिळवण्याचा प्रयत्न असेल. (IND vs HK Match Latest Updates)

IND vs HK, Asia cup Match
आज हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात ऋषभ पंत प्लेइंग इलेव्हनमध्ये असणार?

दुसरीकडे हॉंगकॉंगचा संघ भारताविरुद्ध दबावात असला तरी, त्यांच्याकडे गमावण्यासारखे काहीही नाही, त्यामुळे ते निर्भिडपणे खेळण्याचा प्रयत्न करेल. आशिया कप पात्रता फेरीत हॉंगकॉंगच्या संघाने चांगली कामगिरी केली होती. पात्रता फेरीत संघाचे टॉप ऑर्डर फलंदाज आणि गोलंदाज फॉर्ममध्ये दिसत होते. याशिवाय सांघिक खेळ करून त्यांनी संघाला पात्रता फेरीत पोहचवण्याचे काम केले.

भारत-हाँगकाँग सामना किती वाजता सुरू होईल?

भारत आणि हाँगकाँग यांच्यातील आशिया चषक सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, संयुक्त अरब अमिराती (UAE) येथे होणार आहे. आज म्हणजेच बुधवारी संध्याकाळी 7:30 वाजता सामना सुरू होईल. या सामन्याचं थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट नेटवर्क आणि Disney + Hotstar केलं जाईल.

हॉंगकॉंगविरुद्ध भारताची संभाव्य प्लेईंग ११

रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), रवींद्र जाडेजा, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंह, युजवेंद्र चहल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com