IND vs PAK : सामन्याआधी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं; वेगवान गोलंदाज पडला आजारी

वेगवान गोलंदाज आवेश खानलाही ताप आला आहे.
IND vs PAK Asia Cup Match
IND vs PAK Asia Cup MatchTwitter/@BCCI
Published On: 

IND vs PAK Asia Cup Match : आशिया कप 2022 स्पर्धेत (Asia Cup 2022) आज दुसऱ्यांदा भारत-पाकिस्तान सामना होणार आहे. रविवारी दुबईच्या मैदानावर संध्याकाळी ७:३० वाजता या सामन्याला सुरूवात होईल. दोन्हीही संघाचा उपांत्य फेरी गाठण्याचा प्रयत्न असेल. दरम्यान, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियासमोरील अडचणी काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये.

अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा दुखापतग्रस्त होऊन स्पर्धेबाहेर गेला असतानाच, आता वेगवान गोलंदाज आवेश खानलाही ताप आला आहे. त्यामुळे तो पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळणार की नाही? याबाबत संभ्रम आहे. (Indian vs Pakistan Match Today News)

IND vs PAK Asia Cup Match
India vs Pakistan|राहुल द्रविडने पत्रकार परिषदेत हा शब्द बोलण्यास दिला नकार

एका आठवड्यात दोन्ही संघ आमने-सामने येण्याची ही दुसरी वेळ आहे. २८ ऑगस्ट रोजी झालेल्या रोमांचक सामन्यात भारताने (Team India) शेवटच्या षटकात पाकिस्तानचा पराभव केला होता. त्यावेळी अगदी शेवटच्या षटकात भारताने पाकिस्तानने धूळ चारली होती. मात्र, आजचा सामना भारतीय संघासाठी कठीण जाण्याची शक्यता आहे.

कारण, अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा हा दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर पडला हा भारतीय संघासाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यातच आजच्या सामन्याआधी भारताचा वेगवाग गोलंदाज आवेश खानला ताप आल्याने आवेश सुद्धा या सामन्यात खेळणार की नाही याबाबत अजूनही संभ्रम आहे.

आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघात भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग आणि आवेश खान या तीनच स्पेशालिस्ट वेगवान गोलंदाजांचा स्थान देण्यात आले होते. याशिवाय आर अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई या फिरकी गोलंदाजांची निवड करण्यात आली होती. (Indian vs Pakistan Match Latest News)

IND vs PAK Asia Cup Match
India vs Pakistan Playing XI: कशी असेल टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन? रवींद्र जडेजाची जागा कोण घेणार?

हार्दिक पांड्या हा वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू आहे. त्यामुळे तो भारताचा चौथा वेगवाग गोलंदाज आहे. आता वेगवान गोलंदाज आवेश खान आजारी पडल्याने पाकिस्तानविरुद्धच्या सुपर-4 सामन्यात तो खेळू शकणार नसल्याचे प्रशिक्षक राहुल द्रविडने स्पष्ट केले. म्हणजेच टीम इंडियाला त्याच्या जागी दुसरा खेळाडू उतरवावा लागणार आहे.

आता समस्या अशी आहे की भारताच्या 14 जणांच्या संघात असा एकही खेळाडू नाही जो आवेश खानच्या वेगवान गोलंदाजीची जागा भरून काढेल. त्यामुळे आवेश खानच्या जागी भारतीय संघाला आता फिरकीपटू मैदानात उतरवावा लागणार आहे. हा फिरकीपट्टू रविचंद्रन आश्विन असेल की, रवी बिश्नोई हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.