Ashish Nehra- Shubman gill : शुभमन गिलचा ओव्हर थ्रो अन् नेहरा भडकला; भरमैदानात शिव्या हासडल्या, VIDEO व्हायरल

Ashish Nehra angry on shubman Gill : दिल्ली विरुद्ध गुजरात यांच्यातील सामन्यात कॅप्टन गिलकडून एक चूक झाली. त्यानंतर प्रशिक्षक आशिष नेहरा यानं गिलवर राग काढला. भरमैदानात त्यानं शिवी हासडली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Ashish Nehra Shubman Gill
Ashish Nehra Shubman Gillsaam tv
Published On

IPL 2026, DC vs GT Update : दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील सर्वात रोमांचक सामना झाला. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणाऱ्या या सामन्यात गुजरातचा कर्णधार शुभमन गिल याच्याकडून एक चूक झाली आणि प्रशिक्षक आशिष नेहराचा पारा चढला. त्यानं मैदानातच शिव्या हासडल्या. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कॅपिटल्स यांच्यातील सामन्यात हे सगळं काही अनुभवता आलं. पहिल्या डावात गुजरातने २०० च्या वर धावा केल्या. मग दिल्ली फलंदाजीला आली. हे आव्हान पार करताना भराभर विकेट गमावल्या. मिलरनं सामन्यात रंगत आणली. सामना शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत पोहोचला. दिल्लीने अवघ्या एका धावेने हा सामना गमावला.

मिलरला रडू कोसळलं. हा सामना इतका चित्तथरारक होता की एक धाव महत्वाची होती. सामना सुरू असतानाच गुजरातचा कॅप्टन शुभमन गिल याच्याकडून एक चूक झाली आणि संघाचा प्रशिक्षक असलेला आशिष नेहरा सॉलिड भडकला. त्याचा स्वतःवर कंट्रोल राहिला नाही. त्यानं भरमैदानातच शिव्या हासडल्या. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये आयपीएलचा १४ वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात झाला. हा सामना रोमहर्षक झाला. अखेरपर्यंत संघर्ष सुरू होता. त्यात गुजरात टायटन्सने बाजी मारली. अवघ्या एका धावेने विजय मिळवला. गुजरातचा हा यंदाच्या मोसमातील पहिला विजय ठरला.

सामना अटातटीचा झाला होता. डगआउटमध्ये बसलेले प्रशिक्षकही स्वतःला रोखू शकले नव्हते. दिल्ली कॅपिटल्सचा हेमांग बदानी आणि गुजरात टायटन्सचा आशिष नेहरा मैदानातील खेळाडूंना सूचना करत होता. पण एक वेळ अशी आली की नेहराचा पारा एकदमच चढला.

सामन्यात एकेक धाव अत्यंत महत्वाची होती. पण मोक्याच्या क्षणी गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल याच्याकडून एक चूक झाली. दिल्लीच्या फलंदाजाला रन आऊट करण्याच्या प्रयत्नात त्याने स्टम्पवर थ्रो फेकला. तो इतक्या वेगात होता की बॉल स्टम्पवर लागून सीमापार पोहोचला. एका चेंडूवर ओव्हर थ्रोमुळे पाच धावा दिल्लीला मिळाल्या. त्यामुळे सामन्याची दिशा बदलली जाणार होती हे नेहराच्या लक्षात आले. दिल्लीला २८ चेंडूत ६३ धावांची आवश्यकता होती. दिल्लीचा केएल राहुल आणि ट्रिस्टन स्टब्ज हे क्रिसमध्ये होते. अशावेळी पाच धावा देणे संघाला महागात पडणार होते. त्यामुळे आशिष नेहरा प्रचंड संतापला. तो गिलवर भडकला. रागाच्या भरात त्याने जोरदार शिवी हासडली.

Ashish Nehra Shubman Gill
IPL: गुवाहाटीत होणार RR अन् मुंबई इंडियन्सचा हाय-व्होल्टेज सामना, कोणाचं पारडं आहे जड? जाणून घ्या हेड-टू-हेड रेकॉर्ड

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडिओ एका यूजरने शेअर केला. त्यावर कमेंटचा पाऊस पडत आहे. गुजरातचा प्रशिक्षक आशिष नेहरानं सामना सुरू असताना शिवीगाळ केली. तर इतका राग योग्य नाही, असं काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. तर काही यूजर्सनं तर जुन्या जखमेवरच्या खपल्या काढल्यासारखी जुनी आठवण सांगितली. नेहरानं तर भरमैदानात अशाच प्रकारे महेंद्रसिंग धोनीलाही शिव्या दिल्या होत्या. दिनेश कार्तिकवरही आयपीएल स्पर्धेत भडकला होता, असं काही नेटकऱ्यांनी कमेंटमधून सांगितलं.

Ashish Nehra Shubman Gill
IPL Points Table: MIचा दरारा गायब, राजस्थानच्या विजयानं पॉईट्स टेबलमध्ये मोठी उलटफेर; कोणत्या संघाला किती मिळाले पॉईट्स?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com