

आयपीएल २०२६ चा १३ वा सामना RR आणि MI यांच्यात होणार
गुवाहाटीच्या बरसापारा स्टेडियमवर रंगणार रोमांचक लढत
दोन्ही संघांमध्ये नेहमीच चुरशीचे सामने झाले आहेत.
आयपीएल २०२६ चा १३ वा सामना होणार आहे, ज्यात राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स आमने-सामने येणार आहेत. ७ एप्रिल रोजी गुवाहाटी येथील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर होणारा हा सामना अत्यंत रोमांचकारी होईल. राजस्थान आणि मुंबई जेव्हा-जेव्हा आमनेसामने आलेत त्यांच्यातील सामना नेहमीच अटीतटीचा राहिला आहे. या दोन संघांमध्ये कोणी सर्वाधिक विजय मिळवलाय आहे, हे जाणून घेऊ.
मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्सचा सामना गुवाहटी येथील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. ६३ आणि ६६ मीटर लांब सीमारेषा असणाऱ्या या स्टेडियमवर १७० धावांचे लक्ष्यही आव्हानात्मक ठरत असते.
एकूण सामने: ३१
मुंबई इंडियन्सचे विजय: १६
राजस्थान रॉयल्सचे विजय: १४
अनिर्णित: १
राजस्थान रॉयल्सने या हंगामाची दणक्यात सुरुवात केली आहे. आपले दोन्ही सामने जिंकून संघाने प्रतिस्पर्ध्यांचा घाम फोडला आहे. पहिल्या सामन्यात राजस्थानने चेन्नई सुपर किंग्सचा ८ गडी राखून पराभव केला होता. राजस्थानच्या संघाने २१० धावांचे लक्ष्य सहज गाठले होते. दुसऱ्या सामन्यात त्यांनी गुजरात टायटन्सविरुद्ध २१० धावा करून ६ धावांनी विजय मिळवला होता. राजस्थान रॉयल्सचा स्टार फलंदाज यशस्वी जैस्वाल आणि ध्रुव जुरेल हे जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. यासह गोलंदाजीही उत्कृष्ट होत आहे. त्यामुळे मुंबईसमोर राजस्थानाचे आव्हान जरा कठीणच असणार आहे.
मुंबई इंडियन्सची सुरुवात संमिश्र झाली आहे. पहिला सामना जिंकल्यानंतर, त्यांना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध दुसरा सामना गमवावा लागला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने १६२/६ धावा केल्या होत्या. यात सूर्यकुमार यादवने शानदार अर्धशतक आणि रोहित शर्माने ३५ धावांची खेळी केली होती. मात्र गोलंदाजांना प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंना कमी धावसंख्येत बाद करता आलेन नाही. यामुळे मुंबईला आता आजच्या या सामन्यात विशेषतः गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. राजस्थान रॉयल्स या हंगामात उत्कृष्ट फॉर्ममध्ये असताना, मुंबई इंडियन्सकडे पुनरागमन करण्याची सुवर्णसंधी आहे. दोन्ही संघांमधील हा सामना खूपच रोमांचकारी ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.