Arjun Tendulkar: अर्जुनसाठी 'तो' खास क्षण; 'बापमाणूस' सचिन तेंडुलकरला गलबलून आलं, दिग्गज खेळाडूचा खुलासा

Arjun Tendulkar: अर्जुनला आयपीएल खेळताना बघून सचिन तेंडुलकरची काय अवस्था झाली होती, याबाबत दिग्गज क्रिकेटपटूनं मोठा खुलासा केला आहे.
Sachin Tendulkar On Arjun Tendulkar Debut In IPL
Sachin Tendulkar On Arjun Tendulkar Debut In IPLSAAM TV

Sachin Tendulkar On Arjun Tendulkar Debut In IPL : क्रिकेटचा देव अशी ओळख असलेल्या सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याने यंदाच्या आयपीएल स्पर्धेतून पदार्पण केले. सुरुवातीच्या दोन सामन्यांतच उत्तम कामगिरीनं सध्या तो तुफान चर्चेत आहे. सचिन आणि अर्जुन ही अशी बाप आणि लेकाची जोडी आहे ज्यांनी आयपीएल स्पर्धा खेळली आहे. अर्जुनला आयपीएल खेळताना बघून सचिन तेंडुलकरची काय अवस्था झाली होती, याबाबत दिग्गज क्रिकेटपटूनं मोठा खुलासा केला आहे.

अर्जुन तेंडुलकरनं (Arjun Tendulkar) आयपीएल स्पर्धेच्या सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांत उत्तम गोलंदाजी केली. सनरायजर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात त्यानं आयपीएलमध्ये (IPL 2023) पहिली विकेटही घेतली. अर्जुननं मुंबईच्या विजयात मोलाचा वाटाही उचलला. दुसरीकडे आयपीएलमध्ये कॉमेंट्री करणारे माजी दिग्गज क्रिकेटपटू इयान बिशप यांनी मोठा खुलासा केला आहे. अर्जुनला आयपीएल खेळताना बघून सचिनच्या डोळ्यांत पाणी आले होते, असे ते म्हणाले.

Sachin Tendulkar On Arjun Tendulkar Debut In IPL
Sachin Tendulkar: अर्जुनचा पहिला सामना सचिनने ड्रेसिंग रूममधून का पाहिला? सचिनने सांगितलेलं कारण ऐकून अभिमान वाटेल

वेस्टइंडीज संघाचे माजी क्रिकेटपटू बिशप यांनी सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) बाबतीत मोठा खुलासा केला आहे. अर्जुनने आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्या क्षणी सचिनच्या डोळ्यांत पाणी तरळले होते.

हैदराबाद विरुद्ध मुंबई सामन्यात कॉमेंट्री करणारे बिशप यांनी स्टार स्पोर्टशी बोलताना सांगितले की, 'फ्लोर मॅनेजरचे सचिनशी बोलणे झाले होते. मी त्यांचे नाव घेणार नाही. पण ते म्हणाले की अर्जुन आयपीएल खेळतोय, यामुळे मी खूप खूश आहे. त्यावेळी सचिनचे डोळे अश्रूंनी भरले होते. सचिन मॅनेजरला म्हणाला की, मी आयपीएलमध्ये पहिल्यांदा गोलंदाजी केली त्यावेळी पहिल्या षटकात पाच धावा दिल्या होत्या. अर्जुनच्याही पहिल्या षटकात त्याने पाच धावा दिल्या.'

Sachin Tendulkar On Arjun Tendulkar Debut In IPL
Sachin Tendulkar IPL 2023: मुलाचं पदार्पण होताच क्रिकेटचा देव भावुक! खास पोस्ट शेअर करत दिल्या शुभेच्छा

अर्जुनचं प्रत्येक षटक सचिन आठवणीत ठेवणार - रवी शास्त्री

भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक आणि समालोचक रवी शास्त्री यांनीही सचिन आणि अर्जुनविषयी विशेष टिप्पणी केली. अर्जुन जेव्हा कधी गोलंदाजी करेल तेव्हा सचिन टेन्शनमध्ये असेल. सचिन भले स्वतःच्या इनिंग विसरेल, पण अर्जुनने टाकलेले प्रत्येक षटक त्याच्या लक्षात राहील. अर्जुनचे प्रत्येक षटक तो लक्षात ठेवेल, असे रवी शास्त्री म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com