RCB vs RR: थ्रिलर आणि सस्पेंसचं मिश्रण; शेवटच्या २ ओव्हर्समध्ये RCB च्या बाजूने कसा पलटला सामना?

RCB vs RR Highlights IPL 2025 : गुरुवारी राजस्थान रॉयल्स विरूद्ध रॉयल चॅलेंजर बंगळूरू यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात आरसीबीने शेवटच्या दोन ओव्हर्समध्ये सामना पालटला.
RCB vs RR Highlights IPL 2025
RCB vs RR Highlights IPL 2025 saam tv
Published On

गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू विरूद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये सामना खेळवण्यात आला. या सामन्यात आरसीबीने राजस्थान रॉयल्सचा ११ रन्सने पराभव केला. एम चिन्नस्वामीमध्ये खेळवलेल्या या सामन्यात आरसीबीने पहिल्यांदा फलंदाजी करताना २०५ रन्स केले होते. दरम्यान या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानच्या टीमने २० ओव्हर्समध्ये १९४ रॅन्सपर्यंत मजल मारली.

२०६ रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना एकवेळ राजस्थान हा सामना जिंकेल असं दिसून येतं होतं. यावेळी ओपनर यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशी यांनी टीमला चांगली सुरुवात करून दिली. दोघांमध्येही ५२ रन्सची पार्टनरशिप झाली. मात्र वैभव या सामन्यात अवघ्या १६ रन्सवर बाद झाला. दुसरीकडे जयस्वालने तुफानी अंदाजात १९ बॉल्समध्ये ४९ रन्सची खेळी केली.

RCB vs RR Highlights IPL 2025
Gautam Gambhir: पहलगाम हल्ल्यानंतर गौतम गंभीरला दहशतवाद्यांकडून जीवे मारण्याची धमकी

सामन्यात एक वेळ अशी होती की राजस्थानने ११० रॅन्सच्या स्कोरवर २ विकेट्स गमावले होते. मात्र पुढच्या २४ रन्समध्ये त्यांनी २ सेट फलंदाजांची विकेट गमावली. राजस्थानच्या हातातून हा सामना शेवटच्या २ ओव्हर्समध्ये निसटला. नेमकं काय झालं ते पाहूयात.

RCB vs RR Highlights IPL 2025
मुंबईचा सलग चौथा विजय, हैदराबादचा घरच्या स्टेडियमवर पराजय; MI ने पॉईंट्स टेबलवर मारली मोठी उडी

शेवटच्या २ ओव्हर्समध्ये पलटला सामना

१२ ओव्हर्सनंतर राजस्थानला जिंकण्यासाठी ८ ओव्हर्समध्ये ७८ रन्सची गरज होती. मात्र पुढच्या पाच ओव्हर्समध्ये आरसीबीच्या गोलंदाजांनी त्यांची जादू दाखवली. 18 व्या ओव्हरमध्ये भुवनेश्वर कुमारने तब्बल २२ रन्स खर्च केले. यावेळी आरसीबी सामना गमावणार असं चित्र दिसत होतं. मात्र १९ व्या ओव्हरमध्ये जॉश हेजलवूड फलंदाजीला आला. यावेळी राजस्थानच्या टीमला जिंकण्यासाठी १८ रन्सची गरज होती.

मात्र १९ व्या ओव्हरमध्ये जॉश हेजलवूड गोलंदाजीला आला आणि त्याने राजस्थानच्या टीमचा संपूर्ण खेळ संपवला. या ओव्हरमध्ये त्याने ध्रुव जुरेल आणि जोफ्रा आर्चर यांनी विकेच घेतल केवळ १ रन दिला. यानंतर २० आणि शेवटच्या ओव्हरमध्ये यश दयाल गोलंदाजीला आला. त्याने ५ रन्स दिले आणि या ओव्हरमध्येही २ विकेट्स मिळाले. अशा पद्धतीने ११ रन्सने आरसीबीचा विजय झाला.

RCB vs RR Highlights IPL 2025
Video: क्रिकेट नव्हे तर कुस्तीचा आखाडा! भर मैदानात गोलंदाजाने आपल्याच खेळाडूचं थोबाड फोडलं; रक्तबंबाळ झाला खेळाडू

राजस्थान प्लेऑफच्या रेसमधून बाहेर?

सनरायझर्स हैदराबादला हरवून मुंबई इंडियन्स २३ एप्रिल रोजी पॉईंट्स टेबलमध्ये आरसीबीच्या पुढे आली होती. मात्र अवघ्या २४ तासांच्या आत आरसीबीने पुन्हा मुंबईला मागे ढकललं आहे. ६ सामन्यात विजय मिलवून १२ पॉईंट्सह आरसीबी पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. तर आता मुंबई चौथ्या स्थानावर आली आहे. दुसरीकडे राजस्थान रॉयल्ससाठी प्लेऑफचे दरवाजे अजून पूर्णपणे बंद झालेले नाहीत. मात्र हा मार्ग कठीण असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com