मुंबईचा सलग चौथा विजय, हैदराबादचा घरच्या स्टेडियमवर पराजय; MI ने पॉईंट्स टेबलवर मारली मोठी उडी

SRH VS MI IPL 2025 : सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स या सामन्यात मुंबईने सहज विजय मिळवला. गोलंदाजी ते फलंदाजी सर्व बाजूंनी मुंबई हैदराबादला वरचढ ठरली. हा मुंबईचा सलग चौथा विजय आहे.
SRH VS MI IPL 2025
SRH VS MI IPL 2025X
Published On

IPL 2025 मधील ४१ वा सामना अतिशय रोचक ठरला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स आमनेसामने आले. टॉस जिंकून मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि तो पूर्णपणे यशस्वी ठरला. सुरुवातीपासूनच मुंबईने हैदराबादवर वचक ठेवला. मुंबईच्या गोलंदाजांनंतर फलंदाजांनी कमाल कामगिरी केली. मुंबई इंडियन्सनी हा सामना ७ विकेट्स आणि २६ चेंडू राखत जिंकला.

अवघ्या १३ धावांवर मुंबईच्या गोलंदाजांनी हैदराबादच्या ४ प्रमुख फलंदाजांना तंबूत पाठवले. नवव्या ओव्हरअखेर हैदराबादची अवस्था ३५ धावांत ५ विकेट अशी होती. हेनरिक क्लासेन आणि अभिनव मनोहर यांनी जबाबदारीने फलंदाजी करत १०१ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली आणि संघाला सावरले. त्यांच्या खेळीमुळे सनरायझर्स हैदराबादने १४३ धावा केल्या.

SRH VS MI IPL 2025
SRH VS MI Fixing : अंपायरचं कन्फुजन, इशान किशनची विकेट अन् मॅच फिक्सिंगच्या चर्चांना सुरूवात

१४४ धावा करताना रायन रिकल्टन आणि रोहित शर्मा सलामीसाठी मैदानात उतरले. ११ धावा करुन रिकल्टन माघारी परतला. त्यानंतर रोहितने विल जॅक्स आणि सूर्यकुमार यादव यांच्यासोबत भागीदारी केली. विल जॅक्सने २२ धावा केल्या. ७० धावांवर रोहित शर्मा कॅचआउट झाला. सूर्यकुमार यादवने नाबाद ४० धावा केल्या. विजयाचा चौकार देखील सूर्याने मारला. सलग ४ सामने जिंकल्यानंतर मुंबईचा नेटरनरेट वाढला आहे. पॉईंट्स टेबलवर मुंबईने तिसऱ्या क्रमावर झेप घेतली आहे.

SRH VS MI IPL 2025
'बीसीसीआयची भ्रष्टाचार विरोधी संस्था आता...'; राजस्थान रॉयल्सवर मॅच फिक्सिंगचे आरोप, BCCI ने थेट स्पष्टीकरण देत विषयच संपवला

मुंबई इंडियन्सची प्लेईंग ११ -

रायन रिकल्टन, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ड, जसप्रीत बुमराह, विग्नेश पुथूर.

सनरायजर्स हैदराबादची प्लेईंग ११ -

अभिषेक शर्मा, ट्रेव्हिस हेड, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, पॅट कमिन्स (कर्णधार), जयदेव उनदकट, हर्षल पटेल, ईशान मलिंगा, झीशान अन्सारी.

SRH VS MI IPL 2025
Heinrich Klaasen : ६,४..४..४..४..४.. पुथुर-पंड्याची धुलाई, हेनरिक क्लासेनचे अर्धशतक अन् हैदराबादची नामुष्की टळली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com