

NHAI मध्ये काम करण्याची संधी
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात समर इंटर्नशिप
दर महिन्याला मिळणार २०,००० रुपयांची पेन्शन
इंजिनियरिंग आणि मॅनेजमेंट फील्डमध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. आता तुम्हाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. NHAI ने भरती जाहीर केली आहे. त्यामुळे तुम्हाला चांगल्या सरकारी प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळणार आहे. NHAI मध्ये समर इंटर्नशिपअंतर्गत काम करण्याची संधी मिळणार आहे.
NHAI मधील समर इंटर्नशिपसाठी अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट तरुण अर्ज करु शकतात. तुम्हाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाअंतर्गत अनेक प्रकल्पांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे.
नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडियामधील ही इंटर्नशिप २ महिन्याची असणार आहे. तुम्हाला प्रत्यक्ष काम करण्यास मिळणार आहे. ही इंटर्नशिप दोन महिन्याची असणार आहे. या इंटर्नशिपमध्ये तुम्हाला स्टायपेंडदेखील मिळणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी इंटर्नशिपसाठी रजिस्ट्रेशन करायचे आहे.
एनएचएआयमधील इंटर्नशिपसाठी निवड झाल्यावर तुम्हाला दर महिन्याला २०,००० रुपयांची स्टायपेंड मिळणार आहे. दोन महिन्यासाठी ४०,००० रुपये मिळणार आहे. सिविल इंजिनियरिंग आणि मॅनेजमेंट विभागात काम करण्याची संधी मिळणार आहे. या इंटर्नशिपसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ एप्रिल २०२६ आहे. यासाठी फक्त ५ दिवस उरले आहेत. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करायचे आहेत.
अर्ज कसा करावा? (NHAI Internship Application Process)
सर्वात आधी तुम्हाला NHAI च्या अधिकृत वेबसाइट nhai.gov.in वर जायचे आहे.
यानंतर रिक्रुटमेंट सेक्शनवर जा.
यानंतर तुम्ही NHAI Summer Internship 2026 Apply टॅबवर क्लिक करा.
यानंतर Internship Application Portal वर जा. तिथे आधी रजिस्ट्रेशन करावे.
यानंतर पुन्हा एकदा लॉग इन करा. फॉर्ममध्ये सर्व माहिती भरा.
यानंतर तुमची सर्व माहिती भरल्यानंतर एकदा चेक करा. त्यानंतर अर्ज सबमिट करा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.