DRDO Recruitment: डीआरडीओमध्ये काम करण्याची संधी; अप्रेंटिस पदासाठी भरती; स्टायपेंडदेखील मिळणार; अर्ज कसा करावा?

DRDO INMAS Apprentice Recruitment 2026: डीआरडीओमध्ये काम करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. अप्रेंटिस पदासाठी ही भरती केली जाणार आहे. १ वर्षासाठी ही नियुक्ती केली जाणार आहे.
DRDO Job
DRDO JobGoogle
Published On
Summary

डीआरडीओमध्ये काम करण्याची संधी

अप्रेंटिस पदासठी भरती

१ वर्षासाठी होणार नियुक्ती

फ्रेशर्स आहात आणि नोकरी शोधताय तर ही बातमी खास तुमच्यासाठी. रक्षा संशोधन आणि विकास संघटना म्हणजेच DRDO मध्ये काम करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे.डीआरडीओने इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर मेडिसिन अँड एलाइड सायन्स (INMAS), दिल्लीत भरती जाहीर केली आहे. अप्रेंटिस पदासाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करायचे आहेत.

DRDO Job
Prasar Bharti Job: प्रसार भारतीमध्ये सरकारी नोकरीची संधी; पात्रता काय? अर्ज कसा करावा? वाचा

डीआरडीओमधील अप्रेंटिसशिप ही इंजिनियरिंग आणि सायन्स विद्यार्थ्यांसाठी आहे. या तरुणांना रक्षा मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या कंपनीत काम करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे तुमच्यासाठी ही उत्तम संधी आहे.

पात्रता

डीआरडीओमधीस या भरतीद्वारे ग्रॅज्युएट आणि टेक्निशियन अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर केली आहे. त्यामुळे ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने बी.ई किंवा बी.टेक पदवी प्राप्त केलेली असावी. टेक्निशिनयन पदासाठी इंजिनियरिंगमध्ये डिप्लोमा केलेला असावा. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची किमान वयोमर्यादा १८ वर्षे असावी.

डीआरडीओमधील ही अप्रेंटिसशिप १२ महिन्यांची असणार आहे. यामध्ये ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी १२,००० ते १२,३०० रुपये स्टायपेंड तर डिप्लोमाधारकांना १०,००० ते ११,००० रुपये स्टायपेंड मिळणार आहे. या इंटर्नशिपमध्ये तुम्हाला चांगल्या प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळणार आहे.

DRDO Job
Government Job: १० वी शिक्षण झालेल्यांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कसा कराल अन् शेवटची तारीख काय? जाणून घ्या

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मेरिट लिस्टद्वारे केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी ईमेल किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. याबाबत सविस्तर माहिती तुम्हाला DRDO च्या वेबसाइटवर मिळणार आहे.

DRDO Job
Vastu Tips For Job: प्रमोशन आणि पगारात वाढ होत नाही? मग 'या' 5 टिप्स फॉलो करा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com