Manasvi Choudhary
वास्तुशास्त्रात, ऑफिस कामाच्या ठिकाणाचे अनेक नियम सांगितले आहेत.
ऑफिसमध्ये केवळ मेहनतीचे काम करून तुमची प्रगती होत नाही तर ऑफिसमधील वातावरण देखील महत्वाचे असते.
ऑफिसचे वातावरण हे सकारात्मक असणे अत्यंत महत्वाचे असते याचा सकारात्मक परिणाम तुमच्या कामावर होतो.
ऑफिसमध्ये उत्तर किंवा पूर्व दिशेला चेहरा करून बसावे.
तुमच्या कामाच्या ठिकाणी टेबलवर जुन्या पावत्या, फायली, अनावश्यक कागदपत्रे ठेवू नका.
टेबलवर हिरवे रोपटे ठेवावे म्हणजे सकारात्मक ऊर्जा टिकून राहील.
ऑफिसच्या टेबलवर कधीही तुटलेल्या वस्तू, घड्याळ ठेवू नका.
जर ऑफिसमध्ये तुमची पगारवाढ होत नसेल तर तुमचे मेहनतीचे फळ योग्य वेळी मिळत नसेल तर देवी लक्ष्मीची मनोभावे पूजा करा.
श्रीं. हीं. क्लीं महालक्ष्म्यै नम: या मंत्राचा जप करा. माता लक्ष्मीला , माझ्या कष्टायचे योग्य फळ मला दे असं मागा. माझ्या प्रगतीतील अडथळे दूर कर अशी मनोभावे प्रार्थना करा.