ISRO Recruitment: खुशखबर! इस्त्रोमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; पगार १ लाख ४२ हजार रुपये; अर्ज कुठे अन् कसा करावा?

ISRO Recruitment 2025: इस्त्रोमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. इस्त्रोमध्ये सध्या विविध विभागांमध्ये भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्हाला भरघोस पगार मिळणार आहे.
ISRO Jobs
ISRO JobsSaam tv
Published On

तरुणांसाठी नोकरी करण्याची उत्तम संधी आहे. इस्त्रोमध्ये सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संघटनेत विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. यामध्ये टेक्निकल, सायंटिस्ट, लायब्ररी असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. जर तुम्हालाही इस्त्रोसारख्या चांगल्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळणार आहे. या नोकरीसाठी तुम्ही isro.gov.in आणि vssc.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.

ISRO Jobs
Highest Salary Job: भारतातील सर्वांत जास्त पगार देणारी नोकरी कोणती आहे?

इस्त्रोमधील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ जून २०२५ संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

टेक्निकल असिस्टंट, मेकॅनिकल असिस्टंट, कॉम्प्युटर सायन्स असिस्टंट, केमिकल, ऑटोमोबाईल, सिव्हिल, रेफ्रिजरेशन टेक्निकल असिस्टंट, लॅब असिस्टंट अशा विविध पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंग/ इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनियरिंग / इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियरिंग / इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियरिंग / मेकॅनिकल इंजिनियरिंग या विषयात डिप्लोमा केलेला असावा. जर तुम्ही शैक्षणिक पात्रतेत बसत असाल तरच या नोकरीसाठी अर्ज करावेत.ग्रंथालय सहायक पदासाठी बॅचलर पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे.

ISRO Jobs
Government Job: सरकारी नोकरीची संधी! DRDO मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया, कसा कुठे कराल अर्ज?

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा १८ ते ३५ वर्षे असावी. सहाय्यक पदासाठी ४४९०० ते १,४२,४०० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि स्कील टेस्टद्वारे होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला अर्ज करताना ७५० रुपये शुल्क भरायचे आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरण्याची गरज नाही.

ISRO Jobs
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात मेगाभरती! मंत्री प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com