Government Job: सरकारी नोकरीची संधी! DRDO मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया, कसा कुठे कराल अर्ज?

DRDO Recruitment 2025 : सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे. DRDO मध्ये विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे.
Government Job
DRDO Recruitment 2025 saam tv
Published On

सरकारी नोकरीच्या शोधार्थ असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. नोकरी करून देशसेवा करायची असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकतात. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनाने 2025 साठी वैज्ञानिक पदांसाठी भरती जाहीर केलीय. ज्या उमेदवारांनी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलंय तेच उमेदवार या नोकरीसाठी पात्र असणार आहे.

ज्यांना या नोकरीसाठी अर्ज करायचा आहे ते इच्छुक उमेदवार डीआरडीओच्या अधिकृत वेबसाइट rac.gov.in ला भेट देऊ शकतात. ते उमेदवार ऑनलाइन अर्ज करु शकतात. या भरतीची अधिसूचना जूनच्या पहिल्या आठवड्यात रोजगार वृत्तात प्रकाशित होईल,अशी शक्यता आहे. अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसांपर्यंत अर्ज करता येतील. या भरती मोहिमेअंतर्गत एकूण 148 शास्त्रज्ञांची पदे भरली जाणार आहेत. डीआरडीओ, एडीए आणि राखीव श्रेणींच्या पदांचादेखील यात समावेश आहे.

काय आहे पात्रता

जे उमेदवार इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन, मेकॅनिकल, संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये उत्तीर्ण असतील. या पदवी शिक्षणात त्यांनी प्रथम श्रेणी मिळवली असेल तेच उमेदवार भरतीसाठी पात्र मानले जातील. यासह या उमेदवारांकडे GATE परीक्षेचा वैध गुण देखील असणे आवश्यक आहे. सामान्य आणि ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांचे कमाल वय 35 वर्षे असावे. ही मर्यादा ओबीसी (नॉन क्रिमी लेयर) प्रवर्गासाठी 38 वर्षे आणि अनुसूचित जाती/जमातीसाठी 40 वर्षे निश्चित करण्यात आले आहे.

Government Job
EPFOनं कर्मचाऱ्यांना दिली गुड न्यूज; कर्मचारी भविष्य निधीमधील पैशांवर मिळणार भरघोस व्याज

निवड प्रक्रिया?

जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणीतील पुरुष उमेदवारांना 100 रुपयांचा अर्ज शुल्क भरावे लागेल. अनुसूचित जाती, जमाती, दिव्यांग आणि सर्व महिला उमेदवारांना अर्ज करण्यास कोणतेच शुल्क लागणार नाही. ही निवड प्रक्रिया GATE स्कोअरवर आधारित असणार आहे. उमेदवारांची यादी 1:10 च्या प्रमाणात केली जाईल आणि त्यांना मुलाखतीसाठी संपर्क केला जाईल. जे उमेदवार या पात्र आहेत, त्यांनी जूनच्या पहिल्या आठवड्यात अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अर्ज करावा.

परराष्ट्र मंत्रालयात नोकरी करण्याची सुवर्णसंधी

सरकारी विभागात नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सेक्शन ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलीय. या नोकरीबाबत सविस्तर माहिती mea.gov.in या वेबसाइटवर दिलीय. तुम्हाला याच वेबसाइटवरुन अर्ज करायचा आहे. परराष्ट्र मंत्रालयात ७४ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com