
अकरावीच्या विद्यार्थ्यांची महत्त्वाची बातमी आहे. अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची आज शेवटची तारीख आहे. अकरावी प्रवेशासाठी 26 मे पासून ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया राबवली जात आहे. आधी या नोंदणीसाठी 3 जूनपर्यंत मुदत होती. ती नंतर 5 पर्यंत वाढवण्यात आली. आज ५ जून गुरुवार दुपारी 2 वाजेपर्यंत नोंदणीची प्रक्रिया सुरू राहील.
धुळे
आतापर्यंत धुळे जिल्ह्यात 15 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. अंतिम नोंदणीचा आकडा आज सायंकाळपर्यंत स्पष्ट होईल. यंदा प्रथमच अकरावीसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. त्यात सुरुवातीला संकेतस्थळाला अडचणी आल्याने दोन दिवस उशिराने प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. त्यातही पहिले दोन दिवस साइड स्लो चालणे, कागदपत्र अपलोड न होणे अशा अडचणी आल्या. ही स्थिती पाहता नोंदणीसाठी 5 जूनपर्यंत मुदतवाढ वाढविण्यात आली आहे.
कोल्हापूरमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी नोंदणी
इयत्ता अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 39 हजार 416 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने यावर्षी जिल्ह्यासाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया लागू केली आहे. त्याची सुरुवात 26 मे पासून झाली. या प्रक्रियेत प्रत्यक्ष नोंदणी करण्यासाठी 3 जून पर्यंत मुदत होती. ही मूदत आजपर्यंत वाढवली होती.
कोल्हापूर जिल्ह्यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत अकरावीसाठी प्रत्यक्ष नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होती. त्यामुळे नोंदणीसाठी मुदतवाढ द्यावी अशी मागणी विद्यार्थी, पालक, विद्यार्थी संघटनांकडून झाली. त्यावर शिक्षण संचालनालयाने 5 जून पर्यंत दुपारी दोन वाजेपर्यंत नोंदणीला मुदतवाढ दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.