SAIL Recruitment
SAIL RecruitmentSaam Tv

SAIL Recruitment: १२वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी; SAIL मध्ये भरती सुरु; अर्ज कसा करावा?

SAIL Recruitment 2025: स्टील ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. कंपनीत एम अँड एचएस विभागात भरती जाहीर करण्यात आली आहे.
Published on

१२वी पास आहात तर ही बातमी खास तुमच्यासाठी. सध्या स्टील ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. सेलमध्ये सध्या विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

स्टील ऑथोरिटी ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये एम अँड एचएस विभागात भरती जाहीर केली आहे. या विभागात ऑक्युपेशनल हेल्थ सेंटर आणि सीएफपी डिस्पेंसरीमध्ये ड्रेसर कम कपाउंडर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. नर्स या पदासाठीही भरती जाहीर केली आहे.या नोकरीसाठी तुम्ही sail.co.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.

SAIL Recruitment
Railway Jobs : कामाची बातमी! १२ वी पास विद्यार्थ्यांना रेल्वेत नोकरीची संधी, जाणून घ्या अर्ज कसा आणि कुठे भरणार?

सेलमधील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. या भरतीसाठी ६ जागा रिक्त आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ मार्च २०२५ आहे.

सेलमधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा ३० वर्षे असणे गरजेचे आहे. उमेदवारांची निवड वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे. या नोकरीसाठी राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

ड्रेसर कम कपाउंडर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने विज्ञान शाखेतून १२वी पास केलेली असावी. नर्स पदासाठी बारावी पास उमेदवार अर्ज करु शकतात. त्यामुळे १२वी पास ते पदवीधर उमेदवारांना ही नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. वेगवेगळ्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी निश्चित करण्यात आली आहे.

SAIL Recruitment
Government Job: पर्यावरण मंत्रालयात सरकारी नोकरीची संधी; २ लाख रुपये पगार; पात्रता काय? अर्ज कसा करावा? जाणून घ्या

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत भरती

सध्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेतदेखील भरती सुरु आहे. सर्किल बेस्ड एक्झिक्युटिव्ह पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ मार्च आहे. ५१ रिक्त पदांसाठी ही भरती जाहीर केली आहे. या नोकरीसठी तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.

SAIL Recruitment
IDBI Recruitment: शिक्षण पूर्ण झालंय? IDBI बँकेत नोकरीची संधी; ६५० रिक्त जागा, पात्रता अन् अर्जप्रक्रिया जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com